मी महाराष्ट्रात अगदी सुरक्षित, उद्धव ठाकरेंमुळे माझी शिवसेनेबाबतची मतं बदलली : अनुराग कश्यप

"मी महाराष्ट्रात खुश आहे, मला इथं सुरक्षित वाटतं. येथे मला जे बोलायचे आहे ते मी स्पष्टपणे बोलू शकतो," असं मत अनुराग कश्यपने व्यक्त केलं (Anurag Kashyap on Kangana and Shivsena).

मी महाराष्ट्रात अगदी सुरक्षित, उद्धव ठाकरेंमुळे माझी शिवसेनेबाबतची मतं बदलली : अनुराग कश्यप

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतने मुंबईविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज यावर आपली भूमिका मांडत आहेत. आता प्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुराग कश्यपने सुद्धा या प्रकरणावर भाष्य केलं आहे. “मी महाराष्ट्रात खुश आहे, मला इथं सुरक्षित वाटतं. येथे मला जे बोलायचे आहे ते मी स्पष्टपणे बोलू शकतो,” असं मत अनुराग कश्यपने व्यक्त केलं (Anurag Kashyap on Kangana and Shivsena). तो एका मुलाखतीदरम्यान बोलत होता.

अनुराग कश्यप म्हणाला, “मी कुणाचीही बाजू घेत नाही, पण मला महाराष्ट्रात अगदी सुरक्षित वाटतं. मी येथे खुलेपणाने माझी मतं व्यक्त करु शकतो. मागील काळातील अनेक घटनाक्रमामुळे माझ्या मनातील शिवसेनेची प्रतिमा बदलली आहे. त्यामागे एकमेव कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. मी उद्धव ठाकरे यांच्या मतांशी सहमत नसेलही, पण मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं.”

“सरकार सध्या लोकांचं लक्ष खऱ्या मुद्द्यांवरुन हटवून बॉलिवूडवर केंद्रित करत आहे. मी काँग्रेस समर्थक नसून सध्याचं सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे त्याच्या विरोधात आहे,” असंही मत अनुराग कश्यपने व्यक्त केलं.

कंगनाने “मुंबईत आता सुरक्षित वाटत नाही, मुंबई आता पाक व्याप्त काश्मिरसारखी वाटायला लागली आहे” असं वक्तव्य केलं होतं. त्यावर अनुराग कश्यपने कंगना रनौतला चांगलंच फैलावर घेतलंय. याआधी अनुराग कश्यप यांनी कंगनावर निशाना साधला होता. “कंगनाची सध्याची वागणूक तिच्या घरच्यांना किंवा मित्रांना दिसत नसेल तर तिचं या जगात खरंच कुणीच नाही. तिच्या जवळचे तिच्या वागण्यातील चुका तिला दाखवत नसतील तर ते तिचंच नुकसान करत आहेत”, असं अनुराग कश्यप म्हणाला.

दरम्यान, नुकतेच कंगना रनौतने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आपल्या अभिनयासाठी ओळखली जात नसून ‘सॉफ्ट पॉर्नस्टार’असल्याची खालच्या स्तरावरील टीका केली होती. त्यावरुनही कंगनावर जोरदार टीका होत आहे.

हेही वाचा :

Sunny Leone | कंगनाकडून उर्मिलाचा सॉफ्ट पॉर्नस्टार उल्लेख, आता सनी लिओनी म्हणते….

मी क्षत्रीय, शीर धडावेगळं झालं तरी चालेल, पण ते कधीही झुकणार नाही : कंगना रनौत

“उर्मिला मातोंडकर अभिनयासाठी नाही सॉफ्ट पॉर्नसाठी परिचित” कंगनाची जीभ घसरली

व्हिडीओ पाहा :

Anurag Kashyap on Kangana and Shivsena

Published On - 7:35 pm, Sat, 19 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI