मुस्लीम शेजारी दिवाळी साजरी करु देत नाहीत, अभिनेत्याची आरोप करणारी पोस्ट व्हायरल

मुस्लीम शेजारी दिवाळी साजरी करु देत नाहीत, अभिनेत्याची आरोप करणारी पोस्ट व्हायरल

मुस्लीम शेजारी दिवाळी साजरी करु देत नसल्याचा आरोप करणारी पोस्ट एका अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केली (Actor post viral). अभिनेता फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या मालकीच्या एक्सेल एंटरटेनमेंटमध्ये काम करणाऱ्या अभिनेता विश्वास भानूने ही पोस्ट शेअर केली (Muslim Neighbor) .

Nupur Chilkulwar

|

Oct 27, 2019 | 10:45 PM

मुंबई : मुस्लीम शेजारी दिवाळी साजरी करु देत नसल्याचा आरोप करणारी पोस्ट एका अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केली (Actor post viral). अभिनेता फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या मालकीच्या एक्सेल एंटरटेनमेंटमध्ये काम करणाऱ्या अभिनेता विश्वास भानूने ही पोस्ट शेअर केली (Muslim Neighbor) . या पोस्टमध्ये भानू यांचे मुस्लीम शेजारी त्यांना दिवाळी साजरी करु देत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये भानू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केलं आहे (Actor post viral).

भानू हे मुळचे पाटणाचे आहेत. ते मुंबईत कामानिमित्त वास्तव्यास आहेत. मुस्लीम शेजाऱ्यांमुळे ते दिवाळी साजरी करु शकत नसल्याची तक्रार भानू यांनी सोशल मीडियावर केली.

“मी एका मुस्लीम वसाहतीत राहतो आणि आज माझ्या शेजारच्या मुस्लीम लोकांनी मला आणि माझ्या पत्नीला दिवे लावण्यापासून रोखलं. इतकंच नाही तर त्यांनी दारात काढलेली रांगोळी देखील पुसायला लावली. त्यांनी लाईट फोडले, वायर तोडले. तसेच, त्या समुहाने मला इतर सर्व लाईट काढण्यासाठी जबरदस्ती केली”, अशा आशयाची पोस्ट भानू यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली.

मलाड मालवनी येथे राहणाऱ्या भानूला गेल्या वर्षीही मुस्लीम शेजाऱ्यांनी दिवाळी साजरी करु दिली नव्हती. यंदाही त्यांनी रांगोळी काढण्यास तसेच घराबाहेर दिवे लावण्यास मनाई केली, असंही भानू यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं.

भानू यांच्या फेसबुक पोस्टला आतापर्यंत 792 पेक्षा जास्त लोकांनी शेअर केलं. तसेच, त्यावर 400 पेक्षा जास्त कमेंट्स देण्यात आल्या आहेत. भानू यांनी अक्षय कुमारच्या ‘स्पेशल 26’, ‘मर्दानी’ आणि ‘रघु रेमो’ या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें