सारा अली खानने कुटुंबासोबत साजरी केली ईद, भाऊ ‘जेह’चे फोटो केले शेअर, मात्र चाहत्यांची निराशाच!

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खानने (Kareena Kapoor Khan) काही महिन्यांपूर्वीच आणखी एका मुलाला जन्म दिला आहे. अभिनेत्रीच्या दुसर्‍या मुलाची झलक पहाण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.

सारा अली खानने कुटुंबासोबत साजरी केली ईद, भाऊ ‘जेह’चे फोटो केले शेअर, मात्र चाहत्यांची निराशाच!
Khan Family

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खानने (Kareena Kapoor Khan) काही महिन्यांपूर्वीच आणखी एका मुलाला जन्म दिला आहे. अभिनेत्रीच्या दुसर्‍या मुलाची झलक पहाण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. अलीकडेच करीनाच्या लहान मुलाचे नाव निश्चित झाले आहे. करीना आणि सैफच्या छोट्या छोट्या मुलाचे नाव जेह आहे. दरम्यान, ईदच्या निमित्ताने सारा अली खानने (Sara Ali Khan) तिच्या धाकट्या भावासोबत एक खास फोटो शेअर केला आहे.

बुधवारी ईदनिमित्त सारा अली खानने एक फॅमिली फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सारा तिचे वडील सैफ अली खान, भाऊ इब्राहिम अली खान आणि तैमूरसोबत दिसली आहे.

साराबरोबर दिसला जेह

साराने शेअर केलेल्या फोटोचे वैशिष्ट्य म्हणजे या फोटोमध्ये तिचा धाकटा भाऊ ‘जेह’ साराच्या मांडीवर दिसत आहे. होय, करीनाच्या आणि सैफच्या छोटा लाडका जेह साराच्या मांडीवर दिसत आहेत. पण यावेळीसुद्धा फोटो शेअर करताना साराने फिल्टरच्या मदतीने करीनाच्या मुलाचा चेहरा झाकलेला आहे.

सारा अली खानने फोटो सामायिक करताना चाहत्यांचे ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ईदच्या शुभेच्छा देत सारा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ईद मुबारक अल्लाह सर्वांना शांती, आनंद आणि सकारात्मकता प्रदान करो. आम्ही सर्वच चांगल्या दिवसांची आशा करत आहोत.’

पाहा साराची पोस्ट :

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

साराने ज्या प्रकारे जेहचा चेहरा लपवला आहे तो पाहून चाहते सोशल मीडियावर विविध प्रश्न विचारत आहेत. तसे, करीनाचा मुलगा जेह अली खान याचे फोटो इन्स्टाग्रामवर अशा प्रकारे समोर येण्याची ही पहिली वेळ नाही आणि फोटोत नेहमीच त्याचा चेहरा झाकलेला किंवा लपवलेला दिसतो.

चाहत्यांची निराशा

नेहमीप्रमाणेच करीनाचे चाहते जेहला पाहू न शकल्यामुळे निराश झाले असून नुकतेच धाकट्या नवाबचे नाव समोर आले आहे. तैमूर आली खान हा अगदी कमी वयातच मीडिया सेन्सेशन बनला आहे, तर सारा अली खानच्या बालपणीच्या फोटोंचीही सोशल मीडियावर धूम असते. तसे, आम्ही आपल्याला सांगू की यावेळी करीनाने आपल्या दुसऱ्या मुलाला मीडियापासून पूर्णपणे दूर ठेवले आहे. तर, मोठा मुलगा तैमूरची ओळख अभिनेत्रीने सुरुवातीपासूनच माध्यमांशी करून दिली आहे.

(Actress Sara Ali Khan celebrate eid with family also share photos of Jeh)

हेही वाचा :

Luxurious Bungalow | अतिशय आलिशान आणि भव्य शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा यांचे घर, पाहा फोटो

Bigg Boss OTT | यावेळी शोमध्ये असा कंटेंट असणार जो टीव्हीवर होईल बॅन, ‘बिग बॉस ओटीटी’ची धमाकेदार घोषणा!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI