माझ्या प्रचाराबद्दल पाकिस्तानचे आभार, पॉर्नस्टार जॉनी सिन्सचं खोचक ट्वीट

पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी पॉर्नस्टार जॉनी सिन्सचा फोटो अनवधानाने रिट्वीट केला होता. त्यानंतर, माझा प्रचार करुन फॉलोअर्स वाढवल्याबद्दल आभार, असं खोचक ट्वीट जॉनीने केलं आहे.

माझ्या प्रचाराबद्दल पाकिस्तानचे आभार, पॉर्नस्टार जॉनी सिन्सचं खोचक ट्वीट

मुंबई : पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बासित (Abdul Basit) यांनी काश्मीर प्रकरणी भारतावर खापर फोडण्याच्या नादात पॉर्नस्टार जॉनी सिन्स (Porn Star Johnny Sins) फोटो रिट्विट केला होता. त्यानंतर माझा प्रचार करुन फॉलोअर्स वाढवल्याबद्दल आभार, असं खोचक ट्वीट जॉनीने केलं आहे.

‘अब्दुल बासित यांचे आभार. त्यांच्यामुळे मला नवीन फॉलोअर्स मिळाले. पण माझी दृष्टी शाबूत आहे’ असं ट्वीट करत जॉनीने त्यापुढे हसताना डोळ्यातून पाणी येणारे इमोजी पोस्ट केले.

‘काश्मीरमधील अनंतनागमध्ये भारतीय सैन्याने पॅलेट गनचा हल्ला केल्याने युसूफ नावाच्या व्यक्तीची दृष्टी गेली आहे. त्याच्या बाजूने उभे राहा’ अशा आशयाचं ट्वीट अब्दुल बासित यांनी रिट्वीट केलं होतं. यानंतर ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले होते.

अब्दुल बासित यांनी रिट्वीट केलेल्या पोस्टचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. पाकिस्तानच्या प्रसिद्ध पत्रकार नायला इनायत यांनी देखील बासित यांच्या ट्विटचे अनेक स्क्रीनशॉट पोस्ट केले आहेत. मात्र, बासित यांनी ते रिट्वीट अनडू केलेलं असावं.

जॉनी सीन्सचं ट्विटर अकाऊण्ट व्हेरिफाईड आहे. त्याला तीन लाख 51 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. 40 वर्षांच्या जॉनी सिन्सचं मूळ नाव स्टीवन वूल्फ. अॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये तो प्रचंड लोकप्रिय आहे.

अब्दुल बासित यांनी शेअर केलेल्या ट्वीटमध्ये नेमकं काय?

अब्दुल बासित यांनी रिट्वीट केलेल्या फोटोत दिसणारी व्यक्ती पॉर्नस्टार जॉनी सिन्स (Porn Star Johnny Sins) आहे. तो रुग्णाच्या वेशभूषेत हॉस्पिटलमधील पलंगावर झोपलेला दिसत आहे. त्याच्यासोबत एक तरुणी रडण्याचा अभिनय करताना दिसते. मात्र तीसुद्धा पॉर्नस्टार असून एखाद्या पॉर्न फिल्ममधील हे दृश्य असल्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे अशाच एका ट्वीटमध्ये जॉनी सिन्ससाठी प्रार्थना करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. या व्यक्तीला कर्कराग झाला असून त्याला आशीर्वाद द्या, दुर्लक्ष करु नका. तुमच्या एका लाईकमध्ये एका प्रार्थनेची ताकद आहे, असं त्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. आता हे ट्वीट कोणी अज्ञानातून केलं की खोडसाळपणे किंवा उपरोधातून केलं, आणि अब्दुल बासित त्यांच्या मस्करीला बळी पडले, हे कळायला मार्ग नाही.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI