सिंचन घोटाळ्याची ईडीकडून चौकशी; अजितदादा म्हणाले…

सिंचन घोटाळ्याची पुन्हा एकदा ईडीकडून चौकशी केली जाणार असल्याने त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत.

सिंचन घोटाळ्याची ईडीकडून चौकशी; अजितदादा म्हणाले...
Follow us
| Updated on: Oct 17, 2020 | 5:13 PM

पंढरपूर: सिंचन घोटाळ्याची पुन्हा एकदा ईडीकडून चौकशी केली जाणार असल्याने राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत. (Ajit Pawar on investigation of irrigation scam) मात्र, या चौकशीवर अजितदादांनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करणं योग्य होणार नाही, असं म्हणत अजितदादांनी या विषयावर बोलणं टाळलं.

अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालं आहे. अजित पवार यांनी आज पंढरपुरात जाऊन या भागाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. वेगवेगळ्या एजन्सी चौकशी करत असतात. ते त्यांचं कामच आहे. मागच्या 6-7 वर्षांपासून चौकशी सुरूच आहे. सध्या हा विषय न्यायप्रविष्ठ असल्याने त्यावर बोलणं योग्य नाही, असं अजित पवार म्हणाले.

जलयुक्तची चौकशी आकसाने नाही

जलयुक्त शिवारची चौकशी करण्यात येत असल्यामुळे सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्यात येत आहे का?, असा सवाल पवार यांना विचारण्यात आला. तेव्हा जलयुक्त शिवारावर कॅगने काही मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय आला आणि त्यावर चर्चा झाली. त्यात या चौकशीचा निर्णय घेण्यात आला. जलयुक्तच्या चौकशीचा निर्णय केवळ कॅगच्या आधाराने करण्यात येत आहे. कुणाचीही आकसानं चौकशी करण्याचा प्रश्नच येत नाही, असं सांगतानाच कॅग कुणाच्या नियंत्रणाखाली येतो? असा सवालही त्यांनी केला. (Ajit Pawar on investigation of irrigation scam)

दरम्यान, यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) सिंचन घोटाळ्याचा तपास सुरु होता. 2014च्या निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षात असलेल्या भाजपने सत्तेत आल्यास सिंचन घोटाळ्यातील दोषींना कारागृहात धाडू, असे आश्वासन दिले होते. परंतु, फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर सिंचन घोटाळ्याची चौकशी फारशी पुढे सरकली नव्हती.

तरीही भाजपच्या नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करण्यासाठी वेळोवळी अजित पवार यांच्यावरील सिंचन घोटाळ्यातील आरोपांचा आधार घेतला जात असे. मात्र, 2019च्या विधानसभा निवडणुकीत घडलेल्या सत्तानाट्यावेळी अजित पवार यांनी सर्वांनाच धक्का देत देवेंद्र फडणीवस यांच्यासोबत शपथविधी उरकला होता. यानंतर लगेचच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून न्यायालयात अजित पवार यांना क्लीनचिट देण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते.

परंतु, नंतरच्या काळात अजित पवार यांनी फडणवीस सरकारला तोंडघशी पाडल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडूनही घुमजाव करण्यात आले होते. एसीबीचे तत्कालीन महासंचालक परमबीर सिंह यांनी नजरचुकीने अजित पवारांना क्लीनचिट दिल्याचे न्यायालयाला सांगितले होते. दरम्यानच्या काळात सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडूनही (SIT) अजित पवार यांना क्लीनचिट मिळाली होती. परंतु, आता ‘ईडी’ने याप्रकरणाची चौकशी सुरु केल्यास अजित पवारांची डोकेदुखी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

सिंचन घोटाळा : निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमा, ‘जनमंच’ची मागणी

सिंचन घोटाळा : अजित पवारांनी नियम मोडत प्रकल्प किंमती वाढवल्या

अजित पवारांच्या मनमानीमुळे सिंचन घोटाळा, प्रस्ताव मंजुरीचे परिपत्रकच रद्द केले

(Ajit Pawar on investigation of irrigation scam)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.