AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshay Kumar | नव्या चित्रपटाची घोषणा? कुलभूषण खरबंदांसह अक्षय कुमारचा फोटो इंटरनेटवर चर्चेत!

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा सध्या कामात खूपच व्यस्त आहे. नव्या वर्षात त्याच्या चित्रपटांची मोठी रांग लागणार आहे.

Akshay Kumar | नव्या चित्रपटाची घोषणा? कुलभूषण खरबंदांसह अक्षय कुमारचा फोटो इंटरनेटवर चर्चेत!
| Updated on: Dec 02, 2020 | 6:48 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा सध्या कामात खूपच व्यस्त आहे. नव्या वर्षात त्याच्या चित्रपटांची मोठी रांग लागणार आहे. यातच आता अक्षय कुमारने आज (2 डिसेंबर) त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक सुंदर पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अक्षय कुमारसोबत कुलभूषण खरबंदा देखील दिसत आहेत. या पोस्टरवर खूप छान ओळी लिहिलेल्या आहेत. ज्या अक्षय कुमारच्या चाहत्यांना खूपच भावल्या आहेत. परंतु, यानंतर अक्षय आणखी काय नवीन घेऊन येतोय, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.(Akshay Kumar’s photo with Kulbhushan Kharbanda in discussion) अक्षयने शेअर केलेल्या पोस्टरवर लिहिले आहे की, ‘ही एका वडिलांची आणि त्यांच्या मुलाची सक्सेस स्टोरी’, तर त्याखाली ‘पापा चले हरिद्वार, बेटा बांटे पगार’, असे लिहले आहे. अक्षय कुमारने हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना लिहिले की, ‘भारतात ज्या पद्धतीने व्यवसाय केला जातो, तो आता बदलत चालला आहे. आता व्यवसाय स्मार्ट होईल. उद्या 11.30 वाजता स्क्रीनवर येत आहे.’ या सह ‘मेड इन इंडिया’ नावाचा हॅशटॅगही त्याने लिहिला आहे. कदाचित ही अक्षय कुमारची नवा चित्रपट किंवा जाहिरात असू शकते, अशी चर्चा सर्वत्र आहे.

अक्षय कुमारने मंगळवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती यामुळे बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. बॉलिवूडमध्ये अभिनेता अक्षय कुमारने एक नवा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला होता. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या यादीत अक्षयने पहिले स्थान मिळवले होते. फोर्ब्सने जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांची यादी जाहीर केली होती. या यादीत एकमेव भारतीय अभिनेता अक्षय कुमारच्या नावाचा सामावेश होता. अक्षय कुमार फोर्ब्सच्या यादीत 35 व्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या स्थानावर गायिका टेलर स्विफ्ट होती. फोर्ब्सने अभिनेता अक्षय कुमारला बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता असल्याचे घोषित केले होते. जून 2018 ते 2019 या एका वर्षात अक्षय कुमारने 444 कोटी रुपयांची कमाई केली होती. या शानदार कमाईसोबत अक्षयने आंतरराष्ट्रीय स्टार रेहाना, जॅकी चेन, स्कारलेट जॉनसन आणि ब्रँडली कूपरलाही मागे टाकले होते.

संबंधित बातम्या :

Akshay Kumar | अक्षय कुमार-योगी आदित्यनाथ भेट, उत्तर प्रदेशातील फिल्मसिटी नव्हे ‘या’ खास विषयावर चर्चा!

अक्षय कुमारने 500 कोटींचा दावा ठोकलेल्या युट्यूबरची कहानी, खोट्या बातम्या पसरवून कमवले ‘इतके’ पैसे

(Akshay Kumar’s photo with Kulbhushan Kharbanda in discussion)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.