Fab Phone Fest | स्वस्तात खरेदी करा Samsung, Xiaomi सह ‘हे’ 10 स्मार्टफोन्स

तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे. कारण अमेझॉनने जबरदस्त ऑफर सादर केली आहे.

Fab Phone Fest | स्वस्तात खरेदी करा Samsung, Xiaomi सह 'हे' 10 स्मार्टफोन्स
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 10:21 AM

मुंबई : तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे. ई-कॉमर्स जायंट अमेझॉनने 22 फेब्रुवारीपासून फॅब फोन्स फेस्टची (Fab Phones Fest) सुरुवात केली आहे. यात तुम्ही 40 टक्क्यांपर्यंतच्या सवलतीत स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक अ‍ॅक्सेसरीज खरेदी करू शकता. यात तुम्ही Samsung Galaxy M-series, OnePlus Samsung Galaxy M-series, iPhone आणि OPPO या कंपन्यांचे स्मार्टफोन खरेदी करू शकता. तसेच, नवीनच लाँच केलेले स्मार्टफोन्स Samsung M02, Samsung M02s, Redmi 9 Power आणि Mi 10i देखील खरेदी करु शकता. (Amazon Fab Phone Fest Sale Offer on Fabulous Phones including Samsung Xaomi iPhones)

Fab Phones Fest अंतर्गत कंपनीने वनप्लस 8 प्रो 5 जी हा स्मार्टफोन 54,999 रुपये (मूळ किंमत) या किंमतीऐवजी 47,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या फोनवर अमेझॉनकडून 4,000 रुपयांचं डिस्काऊंट कूपन आणि एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे ईएमआय ट्रान्झॅक्शन केल्यास 3,000 रुपयांपर्यंतचा इंस्टंट डिस्काऊंट मिळेल. Redmi 9 Power या स्मार्टफोनचं 4GB + 64GB वेरिएंट 10,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या फोनची मूळ किंमत 10,999 रुपये इतकी आहे.

या स्मार्टफोन्सवर मिळतोय डिस्काऊंट

⦁ ऑगस्ट 2020 मध्ये लॉन्च झालेल्या Samsung Galaxy M51 च्या बेस वेरिएंटवर चांगली ऑफर देण्यात आली आहे. या फोनची मूळ किंमत 24,999 रुपये इतकी आहे. परंतु हा फोन सध्या 22,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सोबतच या फोनवर 1,250 रुपयांचं अमेझॉन कूपन दिलं जात आहे. त्यामुळे या फोनची किंमत 21,749 इतकी झाली आहे.

⦁ वनप्लस 8 टी हा स्मार्टफोन 3,000 रुपयांच्या अमेझॉन डिस्काऊंट कूपनसह सादर करण्यात आला आहे. त्यामुळे हा फोन तुम्ही 36,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. या फोनवर एसबीआय क्रेडिट कार्ड आणि ईएमआय ट्रान्झॅक्शनवर 3,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काऊंट दिला जात आहे.

⦁ तुम्ही जर आयफोनवेडे असाल तर स्वस्तात आयफोन खरेदी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. तुम्ही बँक ऑफरसह आयफोन 12 मिनी खरेदी करू शकता. ऑफरमध्ये हा फोन तुम्ही 58,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. सोबतच ओप्पो आणि व्हिव्हो स्मार्टफोनवरही तुम्हाला उत्तम ऑफर मिळू शकतात.

⦁ Fab Phones Fest मध्ये नवीनच लाँच करण्यात आलेल्या Redmi 9 Power आणि Mi 10i हे दोन फोन एक्स्ट्रा बँक ऑफर्ससह उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. पॉवरहाउस नोट 9 सिरीज (Powerhouse Note 9 series) 10,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध आहे. Redmi Note 9 Pro हा स्मार्टफोन 11,999 रुपये इतक्या कमी किंमतीत खरेदी करता येईल. तसेच Xiaomi चे हे स्मार्टफोन्स तुम्ही 12 महिन्यांपर्यंतच्या नो-कॉस्ट EMI ऑफरसह खरेदी करु शकता.

⦁ 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह Oppo A31 स्मार्टफोन 11,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. परंतु या फोनची मूळ किंमत 14,990 रुपये इतकी आहे.

⦁ 9,999 रुपये इतक्या किंमतीत लाँच झालेला ऑनर 9A फोन 7,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या फोनमध्ये तुम्हाला 3GB रॅम + 64GB स्टोरेज स्पेस मिळेल.

ट्रिपल कॅमेरासह Redmi 9 Power चं 6GB रॅम वेरिएंट भारतात लाँच, किंमत…

64MP Quad Camera, 7000mAh बॅटरी, इन्स्टंट डिस्काऊंटसह Samsung Galaxy F62 चा पहिला सेल

4GB/64GB, ट्रिपल कॅमेरासह दमदार फीचर्स, Nokia चा बजेट फोन बाजारात

(Amazon Fab Phone Fest Sale Offer on Fabulous Phones including Samsung Xaomi iPhones)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.