छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, बिग बींच्या माफीनाम्याची मागणी

स्पर्धकाला प्रश्न विचारताना ऑप्शनमध्ये दिल्याप्रमाणे बिग बींनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, बिग बींच्या माफीनाम्याची मागणी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेला ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो गोत्यात येण्याची शक्यता आहे. स्पर्धकाला प्रश्न विचारताना ऑप्शनमध्ये दिल्याप्रमाणे बिग बींनी शिवरायांचा एकेरी उल्लेख (Amitabh Bachchan KBC11) केला होता.

टीआरपीमध्ये उसळी मारत लोकप्रियता मिळवत असतानाच ‘केबीसी’ वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हं आहेत. नुकत्याच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये गुजरातची शाहेदा चंद्रन ही स्पर्धक हॉटसीटवर बसली होती. ‘यापैकी कोणता शासक मुघल सम्राट औरंगजेबचा समकालीन होता?’ असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यासाठी चार पर्याय देण्यात आले होते.

ए. महाराणा प्रताप
बी. राणा सांगा
सी. महाराजा रणजीत सिंह
डी. शिवाजी

प्रश्नाचे पर्याय वाचताना अमिताभ बच्चन यांना ही चूक दुरुस्त करता आली असती, असं चाहत्यांचं म्हणणं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करणं साहजिकच कोणालाही रुचलेलं नाही. त्यामुळे सोशल मीडियावरुन प्रेक्षकांसह अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. अमिताभ बच्चन यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी नेटिझन्स करत आहेत.

जर औरंगजेबाच्या नावापुढे ‘मुघल सम्राट’ हा शब्द लावू शकता तर राज्याभिषेक झालेल्या छत्रपतींचा उल्लेख एकेरी का? असा प्रश्न विचारला जात आहे.

आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करुन ‘केबीसी’ने अपमान केला आहे. लवकर माफी मागा नाही तर शो ची एक पण lifeline राहणार नाही !! असा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी (Amitabh Bachchan KBC11) दिला आहे.

हेही वाचा : ‘आंटी’ म्हणणाऱ्या चिमुकल्याला शिवीगाळ, स्वरा भास्करविरोधात तक्रार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI