औरंगाबादेत कोरोनाचा हाहा:कार, 24 तासात 37 रुग्णांची नोंद, कोरोनाबाधितांचा आकडा 545 वर

औरंगाबादेतील रामनगर, चंपा चौक आणि गुरूदत्त नगर परिसरातील नागरिकांना कोरोनाची लागण (Aurangabad Corona Cases Update) झाली आहे.

औरंगाबादेत कोरोनाचा हाहा:कार, 24 तासात 37 रुग्णांची नोंद, कोरोनाबाधितांचा आकडा 545 वर
Follow us
| Updated on: May 10, 2020 | 12:42 PM

औरंगाबाद : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना (Aurangabad Corona Cases Update) दुसरीकडे औरंगाबादेत कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. औरंगाबादेत दिवसभरात 37 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे औरंगाबादेत आकडा 545 वर पोहोचला आहे.

औरंगाबादेत कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. आज (10 मे) सकाळी 21 रुग्णांचा (Aurangabad Corona Cases Update) रिपोर्ट पॉझिटिव्ह केला आहे. त्यानंतर आणखी 16 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 545 वर पोहोचला आहे. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लड्डा यांनी याबाबतची माहिती दिली.

औरंगाबादला कोरोनाचे धक्क्यावर धक्के सुरु आहेत. औरंगाबादेतील रामनगर, चंपा चौक आणि गुरूदत्त नगर परिसरातील नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.

तर दुसरीकडे एका 50 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबळींची संख्या 13 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्ण हा रोशन गेट परिसरात राहणारा रहिवाशी आहे. त्याला मधुमेह आणि किडनीचाही आजार होता. आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.

औरंगाबादमध्ये 15 मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. या रुग्णानंतर बाधितांचा आकडा हळूहळू वाढू लागला. गेल्या 15 दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. हा आकडा थेट पाचशेच्या घरात पोहोचला. त्यामुळे चिंता वाढली आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन प्रचंड मेहनत घेत (Aurangabad Corona Cases Update) आहे.

संबंधित बातम्या : 

औरंगाबादेत कोरोनाचा कहर, दिवसाच्या सुरुवातीलाच 17 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 494 वर

Nashik Corona Update | नाशिकमध्ये कोरोनाचा वाढता कहर, मालेगावातील आकडा 500 च्या उंबरठ्यावर

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.