ऑडीच्या प्रसिद्ध Q5 आणि Q7 SUV सहा लाखांनी स्वस्त, पहा नवी किंमत

लग्झरी कार बनवणारी जर्मनीची कंपनी ऑडी (Audi) ने दोन प्रसिद्ध SUV चे भाव निश्चित काळासाठी कमी केले आहेत. कंपनीने Q5 आणि Q7 SUV ची किंमत तब्बल 6.02 लाख रुपयांनी कमी केली आहे

ऑडीच्या प्रसिद्ध Q5 आणि Q7 SUV सहा लाखांनी स्वस्त, पहा नवी किंमत

मुंबई : लग्झरी कार बनवणारी जर्मनीची कंपनी ऑडी (Audi) ने दोन प्रसिद्ध SUV चे भाव निश्चित काळासाठी कमी केले आहेत. कंपनीने Q5 आणि Q7 SUV ची किंमत 6.02 लाख रुपयांनी कमी केली आहे (Audi Special Offer). ऑडीने भारतात या मॉडेलला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही ऑफर ठेवली आहे. ऑडी Q5 आणि Q7 SUV ला देशात पहिल्यांदा 2009 मध्ये लाँच करण्यात आली होती. गेल्या काही वर्षांमध्ये या दोन गाड्यांना अनेकदा अपडेट करण्यात आलं आहे (Audi Q5, Audi Q7 SUV). ऑडीची Q5 आणि Q7 SUV या देशातील बेस्च सेलिंग लग्झरी SUV आहेत.

5.81 लाख रुपयांनी Audi Q5 स्वस्त

लिमिटेड पीरिअड सेलब्रेटरी प्राईस ऑफरअंतर्गत Audi Q5 च्या पेट्रोल आणि डिझल ऑप्शन्ची किंमत 49.99 लाख रुपये असेल. सध्याच्या किंमतीच्या तुलनेत ही SUV 5.81 लाख रुपयांनी स्वस्त असेल. या SUV ची सध्याची किंमत 55.8 लाख रुपये आहे. तर या ऑफर अंतर्गत ऑडी Q7 पेट्रोल व्हेरिएंटची किंमत 68.99 लाख रुपये असेल. ही SUV ऑफर अंतर्गत 4.83 लाख रुपयांनी स्वस्त मिळेल. या SUV ची सध्याची किंमत 73.82 लाख रुपये आहे.

ऑडीचं Q7 चं डिझल व्हेरिएंट 6.02 लाख रुपयांनी स्वस्त

ऑडीच्या Q7 SUV चं डिझल व्हेरिएंट ऑफरअंतर्गत 6.02 लाख रुपयांनी स्वस्त झालं आहे. या SUV ची सध्याची किंमत 78.01 लाख रुपये आहे आणि ऑफरमध्ये ही SUV 71.99 लाख रुपयांमध्ये उपलब्ध असेल. ऑडीचा हा नवीन ऑफर शुक्रवारपासून सुरु झाला आहे. स्टॉक असेल तोपर्यंत ही ऑफर सुरु राहील.

2009 मध्ये भारतीय बाजारात आल्यापासूनच Q5 आणि Q7 SUV प्रसिद्ध झाल्या. यांच्यामुळे बारतातील ऑडी ब्रँडच्या यशाचा मार्ग मोकळा झाला. आमच्या या दोन सर्वात प्रसिद्ध गाड्यांनी भारतात एक दशक पूर्ण केलं आहे. त्यामुळे आम्ही या स्पेशल प्राईसेससोबत ग्राहकांना रिवॉर्ड करु इच्छितो, असं ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंह ढिल्लन यांनी सांगितलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI