प्रचारात भाऊ-श्रेयाची ‘हवा’, ‘बविआ’च्या रोड शोमध्ये सहभाग

नालासोपाऱ्यातील बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितीज ठाकूर यांच्या रोड शोमध्ये भाऊ कदम आणि श्रेया बुगडे सहभागी झाले होते.

प्रचारात भाऊ-श्रेयाची 'हवा', 'बविआ'च्या रोड शोमध्ये सहभाग
अनिश बेंद्रे

|

Oct 18, 2019 | 9:33 AM

नालासोपारा : नालासोपारा मतदारसंघात विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितीज ठाकूर यांच्या प्रचारासाठी ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता भाऊ कदम आणि अभिनेत्री श्रेया बुगडे (Bhau Kadam Shreya Bugde for Campaign) मैदानात उतरले.

टीव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळवून हसवणारे दोन विनोदवीर प्रचारात सहभागी झाल्यामुळे मतदारांचं लक्ष वेधलं गेलं. श्रेया आणि भाऊ यांना जवळून पाहण्यासाठी, हस्तांदोलन करण्यासाठी गर्दी उसळली होती.

शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार प्रदीप शर्मा यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरारमध्ये सभा घेऊन हितेंद्र ठाकूर यांच्यावर हल्लाबोल केला, त्याच वेळी क्षितीज ठाकूर यांच्या रोड शोमध्ये भाऊ कदम आणि श्रेया बुगडे सहभागी झाले होते.

घरोघरी प्रचार करणाऱ्या क्षितिज ठाकूर यांनी अंतिम टप्प्यात रोड शो करण्यावर भर दिला. तरुणांना आकर्षित करण्यासाठी ‘चला हवा येऊ द्या’ च्या कलाकारांना प्रचारात सहभागी करण्याचा फंडा वापरण्यात आला.

मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील सातवा मंत्री ठरला, जाहीर सभेत घोषणा

नालासोपाऱ्यातील मतदारांना अभिवादन करत क्षितिज ठाकूर यांनी मतदान करण्याचं आवाहन केलं. मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजवावा, आपल्या माणसाला मतदान करावं, असं आवाहन रोड शोमध्ये (Bhau Kadam Shreya Bugde for Campaign) करण्यात आलं.

नालासोपारा मतदारसंघात हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र आणि आमदार क्षितिज ठाकूर यांच्याविरोधात शिवसेनेच्या तिकीटावर माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरले आहेत.

नालासोपारा पूर्वेकडील आचोले तलावापासून बहुजन विकास आघाडीची प्रचार रॅली निघाली होती. गाला नगर, तुलिंज, विजय नगर, जिजाई नगर, नागोदास पाडा, मोरेगाव, मनवेल पाडा या परिसरात रॅली काढण्यात आली.

एकीकडे, ‘चला हवा येऊ द्या’मध्ये बऱ्याच वेळा सरपंचाची भूमिका साकारणारे भारत गणेशपुरे यांनी शिवसेनेचा प्रचार केला. विदर्भात अमरावतीमध्ये जाऊन गणेशपुरेंनी शिवसेना उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन केलं. त्यामुळे प्रचारातही ‘चला हवा..’ची हवा दिसत आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें