‘कोरोना रुग्णांना कुणी बेड देता का हो बेड?’ भीम आर्मीचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भीम आर्मीने अनोखं आंदोलन केलं (Bhim Army agitation against shortage of beds in Pune).

'कोरोना रुग्णांना कुणी बेड देता का हो बेड?' भीम आर्मीचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन
Follow us
| Updated on: Jul 24, 2020 | 6:03 PM

पुणे : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांना बेडची कमतरता जाणवत आहे. त्यामुळेच महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांवर घरीच उपचार करण्याचा निर्णय घेतलाय. हाच मुद्दा पकडून पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भीम आर्मीने अनोखं आंदोलन केलं (Bhim Army agitation against shortage of beds in Pune). ‘कोरोना रुग्णांना कुणी बेड देता का हो बेड?’ असं म्हणत भीम आर्मीने जिल्हा प्रशासनाच्या हतबलतेवर निशाणा साधला. तसेच बेडच्या कमतरतेवर प्रशासनाचं लक्ष वेधलं.

भीम आर्मीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रुग्णालयातील बेड आणून ठेवत ‘कोरोना रुग्णांना कुणी बेड देतं का बेड?’ असं म्हणत आंदोलन केलं. यावेळी भीम आर्मीने जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य सुविधांवर अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच अधिकचे बेड उपलब्ध करुन देण्याऐवजी रुग्णांना घरीच ठेवण्यावर आक्षेप घेतला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल, पुण्यातील बाजार सुरु

दरम्यान, पुण्यात आजपासून लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळे आता मार्केट यार्डातील वेळांमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. यापुढे गुळ आणि भुसार बाजारातील दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरु राहतील. 5 वाजल्यानंतर कोणतेही व्यवहार करु नये, प्रत्येक व्यापाऱ्याने ग्राहकासा मास्क लावणे बंधनकारक करावे, ग्राहकांमध्ये 3 ते 4 फुटांचे अंतर ठेवावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करत तात्काळ दुकान बंद करू, असा इशारा देण्यात आला आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

फूल बाजार उद्यापासून (25 जुलै) 50 टक्के क्षमतेने अटी आणि नियमानुसार सुरु राहिल. उत्तमनगर बाजार देखील शुक्रवारपासून 6 ते 10 वेळेत खरेदी विक्रीसाठी खुला असेल. मांजरी उपबाजार शनिवारपासून (25 जुलै) दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरु राहिल.

हेही वाचा :

EXCLUSIVE: पवार-ठाकरे पॅटर्न अस्तित्वात येणार, जागावाटपही निश्चित, आमच्यासाठी धोक्याची घंटा : संजय काकडे

विधानसभा निवडणुकीवेळी आयोगाकडून भाजपच्या IT सेलचा वापर, पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

संघर्षानंतर नागपूरचे महापौर-आयुक्त पहिल्यांदाच एकत्र, दोन दिवस जनता कर्फ्यू, 4 दिवस लोकप्रतिनिधी रस्त्यावर

Bhim Army agitation against shortage of beds in Pune

Non Stop LIVE Update
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.