Bigg Boss Marathi-2 : बिग बॉसच्या घरातील नवा कॅप्टन कोण?

सोमवारच्या भागात बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टनसी टास्कवरुन चांगलीच जुगलबंदी रंगली. बाप्पा आणि वैशालीला सगळ्यांनी सर्वानुमते कॅप्टनसीची उमेदवारी दिली होती. मात्र, बिग बॉसने गुगली टाकत जो कन्फेशन रुममध्ये पहिले येईल तो कॅप्टनसीचा तिसरा उमेदवार असेल, असं सांगितलं.

Bigg Boss Marathi-2 : बिग बॉसच्या घरातील नवा कॅप्टन कोण?

Bigg Boss Marathi-2/मुंबई : बिग बॉस मराठीचं दुसरं पर्व सध्या रंगत चाललं आहे. दिवसेंदिवस या घरात अपेक्षेप्रमाणे नाट्यमय घडामोडी घडत आहेत. गेला आठवडा हा अभिनेत्री शिवानी सुर्वे हिच्याच अवतीभवती फिरला. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्यासाठी शिवानीने चांगलाच राडा घातला होता. त्यानंतर शनिवारच्या भागात कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी शिवानीची बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी केली. इतकंच नाही तर तिच्या जागेवर एक नवीन स्पर्धक अभिनेत्री हीना पांचाळची घरात एन्ट्री झाली. ‘द शो मस्ट गो ऑन’ म्हणत महेश मांजरेकरांनी सर्व स्पर्धकांना कार्यक्रमात हिरिरीने सहभाग घेण्याची ताकीद दिली.

त्यानंतर सोमवारच्या भागात बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टनसी टास्कवरुन चांगलीच जुगलबंदी रंगली. बाप्पा आणि वैशालीला सगळ्यांनी सर्वानुमते कॅप्टनसीची उमेदवारी दिली होती. मात्र, बिग बॉसने गुगली टाकत जो कन्फेशन रुममध्ये पहिले येईल तो कॅप्टनसीचा तिसरा उमेदवार असेल, असं सांगितलं. कॅप्टनसीची उमेदवारी मिळवण्यासाठी अभिजीत केळकर, शिव ठाकरे आणि नेहा शितोळे हे तिघंही यासाठी उत्सुक होते. पण याचवेळी नेमका राडा झाला. शिवला नेहाला ही संधी मिळवू द्यायची नव्हती. त्यामुळे शिवने अभिजीतला पाठिंबा देत नेहाला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्या गोधंळात नेहा पडली आणि तिच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्या मुद्यावरुन नेहाने बिग बॉसचं घर डोक्यावर घेतलं.

शिव आणि नेहामध्ये यावरुन पुन्हा एकदा जुंपली. शिवने अभिजीतला मदत केल्याचा आरोप यावेळी नेहासह घरातील सगळ्यांनीच केला. परागनेही शिवला त्याने नेहासोबत असं वागायला नको होतं, असा सल्ला दिला. हे शिवला चांगलच झोंबलं. मुळात परागचं अभिजीतशी पटत नसल्यामुळे शिवने त्याला मदत केलेली परागला आवडली नाही. त्यामुळे परागचा तिळपापड झाला. या कारणामुळे पराग, रुपाली आणि किशोरी यांनीही शिवला टार्गेट केलं.

कॅप्टनसी टास्कदरम्यान बाप्पा, वैशाली आणि अभिजीतमध्ये खेळ रंगला. या अफलातून टास्कमध्ये वैशाली सगळ्यांवर वरचढ ठरली. त्यामुळे या आठड्यात वैशाली घरातील कॅप्टन असणार आहे. हा टास्क अभिजीतसाठी धोक्याची घंटा आहे. कारण घरातील बरेच सदस्य यानंतर त्याच्याविरोधात दिसत आहेत. आता वैशालीच्या राज्यात बिग बॉस मराठीच्या घरात काय काय घडतं आणि त्याला वैशाली कसं तोंड देणार, हे पाहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

पाहा Bigg Boss Marathi-2 च्या सर्व बातम्या :

Bigg Boss Marathi – 2 : महेश मांजरेकरांनी परागची लाज काढली

Bigg Boss Marathi – 2 : बिग बॉसच्या घरातून शिवानी सुर्वेला हाकलले

Bigg Boss-13 च्या स्पर्धकांची यादी लीक, यंदा कोण बिग बॉसच्या घरात कैद होणार?

Bigg Boss Marathi : शिवानीने घातली वीणाला लाथ, दोघीही अपात्र, शिक्षा काय?

Bigg Boss Marathi – 2 : माझ्यामुळे मेघा धाडे ‘बिग बॉस’ जिंकली : शिवानी सुर्वे

Bigg Boss Marathi – 2 : ‘बिग बॉस मराठी-2’ मध्ये शिवानीच्या शूजची चर्चा

Published On - 5:43 pm, Tue, 18 June 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI