Bigg Boss 14 | ‘बिग बॉस’च्या घरात नवी वाईल्ड कार्ड एंट्री, कॅप्टनपदासाठी पुन्हा तगडी स्पर्धा!

‘बिग बॉस 14’च्या घरात आता जास्मीन भसीनचा मित्र अली गोनी (Aly Goni) याची वाईल्ड कार्ड स्पर्धक (Wild Card) म्हणून एंट्री झालेली आहे.

Bigg Boss 14 | ‘बिग बॉस’च्या घरात नवी वाईल्ड कार्ड एंट्री, कॅप्टनपदासाठी पुन्हा तगडी स्पर्धा!
Follow us
| Updated on: Nov 05, 2020 | 11:06 AM

मुंबई :बिग बॉस 14’च्या घरात आता जास्मीन भसीनचा मित्र अली गोनी (Aly Goni) याची वाईल्ड कार्ड स्पर्धक (Wild Card) म्हणून एंट्री झालेली आहे. या घरात स्पर्धकांसह प्रेक्षकांनाही अनपेक्षित धक्के मिळतच असतात. नव्या भागात घरात चांगलीच रडारड पाहायला मिळाली. मात्र, अलीच्या येण्याने घरात काहीसा सकारात्मक बदल जाणवला. अचानक आलेल्या अलीला सध्या घरातच विलागीकरणात ठेवण्यात आले आहे. तर, या दरम्यान पार पडलेल्या कॅप्टनसी टास्कमध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये चुरस पाहायला मिळाली (Bigg Boss Latest update Aly Goni enter as wild card contestant).

पवित्रा-एजाजमध्ये पुन्हा भांडण

पवित्रा पुनिया अजूनही एजाज खानवर रागावली आहे. पुन्हा एकदा पवित्रा आणि एजाज यांच्यात भांडण सुरू झाले आहे. या भांडणाने चक्क हाणामारीचे रूप घेतले आहे. या वादादरम्यान पवित्राने एजाजवर चहा फेकला. नॉमिनेशन टास्क दरम्यान घडलेल्या प्रकारचा राग पवित्राच्या मनात अजूनही धुमसत आहे. जास्मीनने पवित्राचा या रागाचे कारण विचारले, तेव्हा पवित्रा म्हणाली, ‘मला तुझा काही राग नाही. पण एजाजने जे माझ्यासोबत केले टे चुकीचे आहे. आणि त्यामुळेच मला राग येतोय’. या वादादरम्यान पवित्रा एजाजला सरडा म्हणाली. काही दिवसांपूर्वी घरातील सगळे स्पर्धक एजाजवर चिडलेले होते, तेव्हा एकट्या पवित्राने एजाजची बाजू घेतली होती. यांनतरही एजाज नॉमिनेशन प्रक्रियेत जास्मीनला सुरक्षित केल्याने पवित्रा चिडली आहे.(Bigg Boss Latest update Aly Goni enter as wild card contestant)

निक्कीनी मागितली राहुलची माफी

गेल्या भागात निक्की तंबोलीने केलेल्या लज्जास्पद कृत्यानंतर निक्की आणि राहुल यांचे नाते तुटले आहे. आजच्या भागाच्या सुरूवातीला निक्की राहुलची माफी मागताना दिसली. पण राहुलने तिला माफ करण्यास नकार दिला. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी तुझ्याशी स्वतःहून बोलेन, असे राहुलने निक्कीला सांगितले (Bigg Boss Latest update Aly Goni enter as wild card contestant).

नुकतेच घरात नॉमिनेशन टास्क पार पडला होता. या वेळी स्पर्धकांना एकमेकांचे ऑक्सिजन मास्क लपवण्याचा टास्क देण्यात आला होता. यावेळी राहुलने आपले मास्क हिसकावू नये म्हणून निक्की तंबोलीने स्वतःचे मस्क चक्क पँटमध्ये लपवून ठेवले. इतकेच नाही तर, मास्क हिसकावून दाखव, असे म्हणत राहुलला डिवचले. निक्कीच्या (Nikki Tamboli) या घाणेरड्या कृत्याने घरातले इतर स्पर्धक चांगलेच वैतागले होते.

चाहत्यांनी केली स्वामी ओमशी तुलना

‘बिग बॉस’च्या (Bigg Boss) मागील एका पर्वात स्वामी ओम या स्पर्धकानेही असे घृणास्पद कृत्य केले होते. स्वामी ओमने स्वतःचे मुत्र एका भांड्यात जमा करून ते घरातील इतर स्पर्धकांवर फेकले होते. निक्कीच्या या कृत्यानंतर घरातल्या सर्वांना स्वामी ओमची आठवण आली आहे. अनेकांनी स्वामी ओमशी तिची तुलना करत तिला ट्रोल केले आहे.

(Bigg Boss Latest update Aly Goni enter as wild card contestant)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.