AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss Marathi – 2 : बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच रुपालीला थोबाडीत मारणार, आई संतप्त

बिग बॉस मराठीच्या घरातून बिचकुलेंना हकला, अन्याथ कठोर पाऊल उचलली जातील असा इशारा रुपालीच्या आईने दिला आहे. तसंच रुपाली घरातून बाहेर आल्यानंतर तिलाही थोबाडीत मारणार असल्याची आक्रमक भूमिका तिच्या आईने घेतली आहे.

Bigg Boss Marathi - 2 : बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच रुपालीला थोबाडीत मारणार, आई संतप्त
| Updated on: Jun 21, 2019 | 12:27 PM
Share

Bigg Boss Marathi – 2 मुंबई : बिग बॉसच्या घरात वाद, भांडण, कुरघोड्या हे नेहमीच होत असतं. यंदाच्या बिग बॉस मराठी सिझन 2 मध्ये अल्पावधीतच प्रसिद्धी मिळालेला एक चेहरा म्हणजे अभिजीत बिचुकले…वादग्रस्त वक्तव्य करणे, टास्क खेळताना नियमांच्या विरुद्ध वागणे, घरातील महिला सदस्यांसोबत फर्ल्ट करणे यामुळे बिचुकले अनेकदा चर्चेत आले आहेत. मात्र अभिनेत्री रुपाली भोसलेला घटस्फोटीत महिला असा उल्लेख केल्याने बिचुकले चांगलेच वादात सापडले आहेत. “बिग बॉस मराठीच्या घरातून बिचकुलेंना तात्काळ हकला, अन्याथ कठोर पाऊल उचलली जातील”, असा इशारा रुपालीच्या आईने ‘टीव्ही 9 मराठी‘शी बोलताना दिला आहे. तसंच रुपाली घरातून बाहेर आल्यानंतर तिलाही थोबाडीत मारणार असल्याची आक्रमक भूमिका तिच्या आईने घेतली आहे.

रुपालीच्या थोबाडीत मारणार

बिचुकले बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर मी त्यांना कानशिलात लगावणार आहे. त्यालाच नव्हे तर मी त्याची वायफळ बडबड ऐकल्याबद्दल रुपालीच्या कानशिलात लगावणार आहे. अशी आक्रमक भूमिका रुपालीच्या आईने घेतली आहे.

हिंदी बिग बॉसमध्ये यांसारखी अश्लील शेरेबाजी, नाटकं चालत असतील पण मराठीत असं दाखवायला नको. हा शो संपूर्ण कुटुंब एकत्रित बसून बघत असते. त्यामुळे त्याबाबतच तारतम्य संबंधित वाहिनीने राखलं पाहिजे असेही रुपालीच्या आईने बिग बॉसला सुनावले आहे.

नेमकं काय घडलं ?

बिग बॉस मराठीच्या 24 व्या भागात बिग बॉसने घरातल्या सदस्यांना १ ते १० या क्रमांकांवर उभं राहण्याचा टास्क दिला होता. या टास्कदरम्यान अभिजित केळकर पहिल्या क्रमांकावर जाऊन उभा राहिला. किशोरी शहाणे दुसऱ्या क्रमांकावर, नेहा शितोळे तिसऱ्या तर अभिजित बिचुकले चौथ्या स्थानावर जाऊन उभे राहिले. या टास्कदरम्यान प्रत्येकाने आपण कोणता क्रमांक निवडला आणि का याचे स्पष्टीकरण द्यायचे होते.

या टास्कदरम्यान रुपाली भोसले सातव्या क्रमांकावर उभी राहिली. आपण इतरांच्या तुलनेत मागच्या क्रमांकावर असल्याने तिला राग आला आणि सगळा राग बिचुकलेंवर काढला. बिचुकले टास्कदरम्यान किंवा घरात कसे खोटं बोलतात, ते इतरांची फसवणूक कशी करतात हे सांगायला रुपालीने सुरुवात केली. मात्र बिचुकलेंनी आरोप फेटाळले, ज्यानंतर रूपाली भोसलेने बिचुकलेंना मुलीची शपथ घेण्यास सांगितले. हे ऐकल्यानंतर तिळपापड झालेल्या बिचुकलेंनी रूपाली भोसलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. शिव्यांचा भडीमार करतानाच बिचुकलेंनी चौथा क्रमांक सोडला आणि क्षणाचाही विलंब न लावता रुपाली चौथ्या क्रमांकावर जाऊन उभी राहिली.

या टास्कमुळे बिग बॉसच्या घरात एक नवा वाद सुरु झाला आहे. या वादावर रुपालीच्या आईने टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी रुपालीच्या आईने ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून अभिजित बिचुकले यांना हकला अशी मागणी केली आहे. तसेच मी विकेंडचा डाव येईपर्यंत वाट बघेन, अन्यथा कठोर पाऊल उचलेन असा इशारा रुपाली भोसलेच्या आईने टीव्ही 9 शी बोलताना दिला आहे. (पुढे वाचा…)

बिचुकलेंनी रागात आपल्या जागेवर आल्यावर त्यांनी रुपालीला घटस्फोटीत महिला असे म्हटलं होते. यामुळे रुपालीची आई चांगलीच भडकली आहे. या वक्तव्यामुळे महिलांचा अपमान झाला असून बिचुकलेंची कार्यक्रमातून हकालपट्टी करावी अशी मागणी रुपालीच्या आईने  केली आहे. त्यामुळे आता वीकेंडच्या भागात मांजरेकर बिचुकलेंवर काय अॅक्शन घेतात. त्यांची घरातून हकालपट्टी होते का हे बघणं इंटरेस्टींग ठरणार आहे.

पाहा व्हिडीओ :

पाहा बिग बॉस मराठी-2 च्या सर्व बातम्या :

Bigg Boss Marathi-2 : शिवने नेहाच्या टीमची इस्त्री चोरली

Bigg Boss Marathi-2 : बिग बॉसच्या घरातील नवा कॅप्टन कोण?

Bigg Boss Marathi – 2 : महेश मांजरेकरांनी परागची लाज काढली

Bigg Boss Marathi – 2 : बिग बॉसच्या घरातून शिवानी सुर्वेला हाकलले

Bigg Boss Marathi : शिवानीने घातली वीणाला लाथ, दोघीही अपात्र, शिक्षा काय?

Bigg Boss Marathi – 2 : माझ्यामुळे मेघा धाडे ‘बिग बॉस’ जिंकली : शिवानी सुर्वे

Bigg Boss Marathi – 2 : ‘बिग बॉस मराठी-2’ मध्ये शिवानीच्या शूजची चर्चा

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.