बीएमडब्ल्यूची सर्वात मोठी सेडान 21 जानेवारीला भारतात लाँच होणार, जाणून घ्या फिचर्स

ऑटो सेक्टरमधील एक्सपेन्सिव्ह ब्रँड BMW नवीन वर्षात एक मोठं प्रोडक्ट भारतीय मार्केटमध्ये सादर करणार आहे.

बीएमडब्ल्यूची सर्वात मोठी सेडान 21 जानेवारीला भारतात लाँच होणार, जाणून घ्या फिचर्स

मुंबई : ऑटो सेक्टरमधील एक्सपेन्सिव्ह ब्रँड BMW नवीन वर्षात एक मोठं प्रोडक्ट भारतीय मार्केटमध्ये सादर करणार आहे. नव्या वर्षात अनेक वाहनं लाँच करण्याचा कंपनीचा मनसुबा आहे. त्याची सुरुवात जानेवारी महिन्यात BMW 3 Series Gran Limousine (GL) च्या लाँचिंगने होईल. 21 जानेवारी 2021 रोजी ही सेडान लाँच केली जाणार आहे. ही कार या सीरिजमधील सर्वात लांब व्हेरिएंट असेल. यामध्ये लेगरुमसाठी भरपूर जागा देण्यात येणार आहे. (BMW Sedan Series 3 Gran Limousine gl will be launched in India on January 21)

BMW 3 सीरिज ग्रॅन लिमोसिन (BMW 3 Series Gran Limousine) भारतातील सर्वात लांब आणि एंट्री लेव्हल सेडान असेल. या स्टँडर्ड कारसह सीएलएआर प्लॅटफॉर्मची शक्यता आहे. कारचं डिझाईन आणि तंत्रज्ञान बीएमडब्ल्यूच्या इतर मॉडल्सप्रमाणेच असेल. या कारमध्ये काय बदल केलेत असा सवाल निर्माण होऊ शकतो. तर या कारची साईज हाच या कारमधील सर्वात मोठा बदल आहे. या कारमध्ये BMW 3 सीरिजमध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत.

फिचर्स

नवीन बीएमडब्ल्यू मध्ये BMW कनेक्टेड कार टेक्नोलॉजी, वायरलेस चार्जिंग, वायरलेस अॅपल कारप्ले, बीएमडब्ल्यू लाइव्ह कॉकपिट प्रोफेशनल, 3 डी नेविगेशन, रियर पार्क असिस्ट, 12.3 इंच डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि 10.25 इंचांची इन्फोटेन्मेंट स्क्रिन दिली जाऊ शकते.

जबरदस्त इंजिन 

या कारमध्ये बीएमडब्ल्यू 3 सीरिज सेडानप्रमाणे इंजिन लाइन-अप दिलं जाऊ शकतं. BMW 3 सीरिज ग्रॅन लिमोसिनमध्ये 2.0 लीटर, 4 सिलेंडरसह टर्बोचार्ज्ड पेट्रोल मोटर मिळेल, अशी शक्यता आहे. हे इंजिन 255 बीएचपी आणि 400 एनएम पीक टॉर्क जनरेट करु शकतं. जर या कारमध्ये डिझेल इंजिन दिलं गेलं तर ते 2.0 लीटर, 4-सिलेंडर, टर्बोचार्ज्ड इंजिन असेल, जे 188 बीएचपी आणि 400 एनएम पीक टार्क जनरेट करेल.

2021 मध्ये बीएमडब्ल्यूचा धडाका

दोन्ही इंजिन स्टँडर्ड 8-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह जोडलेले असतील. तसेच बीएमडब्ल्यू 2 सीरिज ग्रॅन कूप पेट्रोल, 5 सीरिज फेसलिफ्ट आणि 6 सीरिज जीटी फेसलिफ्ट या कारही 2021 च्या शेवटी भारतात लाँच केल्या जातील.

संबंधित बातम्या

देशभरातील कारप्रेमी वाट पाहात असलेली एसयूव्ही 7 जानेवारीला लाँच होणार

जानेवारीमध्ये TATA लॉन्च करणार दोन जबरदस्त कार्स, वाचा काय आहे वैशिष्ट्ये आणि किंमत ?

Renault ची ‘ही’ कार ठरणार सर्वात स्वस्त?, किंमत बघून थक्क व्हाल

(BMW Sedan Series 3 Gran Limousine gl will be launched in India on January 21)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI