शॉपिंगचे पैसे संपले म्हणून नवी मुंबईतील विक्रीकर अधिकाऱ्यावर हल्ला करुन लुटलं, बुलडाण्यात तिघांना अटक

या युवकांनी विक्रीकर अधिकाऱ्यावर चाकूने वार केला. त्याचा गळा चिरुन त्याच्या मोबाईलसह 8 हजार रुपये घेऊन हे तिघे पसार झाले.

शॉपिंगचे पैसे संपले म्हणून नवी मुंबईतील विक्रीकर अधिकाऱ्यावर हल्ला करुन लुटलं, बुलडाण्यात तिघांना अटक

बुलडाणा : मुंबईला खरेदीसाठी गेलेल्या तीन युवकांजवळील पैसे संपल्याने त्यांनी (Attack On Sales Tax Officer) एका विक्रीकर अधिकाऱ्याला लक्ष्य केले होते. या युवकांनी विक्रीकर अधिकाऱ्यावर चाकूने वार केला. त्याचा गळा चिरुन त्याच्या मोबाईलसह 8 हजार रुपये घेऊन हे तिघे पसार झाले. अखेर त्यांना बुलडाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन नवी मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे (Attack On Sales Tax Officer).

बुलडाण्यातील अमित सुनील बेंडवाल, आबिद खान अयुब खान उर्फ कालू, अदनान कुरेशी वहीद कुरेशी उर्फ बब्या हे तिघे शॉपिंग करण्यासाठी मुंबईला गेले होते. पैसे नसल्याने त्यांनी 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास नवी मुंबईतील सीबीडी सर्कल जॉगिंग ट्रॅकजवळून पायी जाणाऱ्या विक्रीकर अधिकाऱ्यावर हल्ला केला. महेश मधुकर बिनवडे असं त्या अधिकाऱ्यातं नाव आहे.

महेश मधुकर बिनवडे यांच्यावर अचानकपणे चाकूने वार करुन या तिघांनी त्यांना जखमी केले. यानंतर त्यांच्या जवळील स्मार्टफोनसह 8 हजार रुपये घेऊन हे चोरटे फरार झाले. या हल्ल्यात महेश बिनवडे यांचा गळा चिरला गेल्याने ते गंभीर जखमी झाले, सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात कलम 394 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. जखमी बिनवडे यांच्या मोबाईलचे लोकेशन ट्रॅक केल्यानंतर तो मोबाईल मुंबईत सापडला. संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यावर बुलडाणा येथील आरोपींनी गुन्हा केल्याचे समोर आले.

याची माहिती बुलडाणा पोलिसांना मिळाल्यावर शहर डीबी पथकाने बुलडाण्यातील आरोपी अमित सुनील बेंडवाल, आबिद खान आणि अदनान कुरेशी या तिघांना ताब्यात घेतलं. या दरोड्यात मुंबईतील अन्य 2 आरोपींचा समावेश असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप साळुंखे यांनी दिली असून आरोपी अमित बेंडवाल याच्यावर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी सांगितले.

Attack On Sales Tax Officer

संबंधित बातम्या :

मुंबईतून मुलीला फूस लावून पळवून नेलं; तरुणाला आठ महिन्यांनी नांदेडमधून अटक

मुंबईत मेट्रो क्रेनचा भीषण अपघात, क्रेन अंगावर पडून महिलेचा मृत्यू

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI