एक-दोन नव्हे, 70 हजारांची सुट्टी नाणी देऊन बाईक खरेदी

अनिश बेंद्रे

|

Updated on: Oct 27, 2019 | 12:28 PM

मध्य प्रदेशातील तरुणाने 70 हजारांच्या होंडा अॅक्टिव्हा बाईकचं पेमेंट सुट्ट्या पैशांच्या रुपात केलं.

एक-दोन नव्हे, 70 हजारांची सुट्टी नाणी देऊन बाईक खरेदी
Follow us

भोपाळ : दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक जण वाहन खरेदी, सोनं खरेदी किंवा गृहप्रवेश करणं पसंत करतात. धनत्रयोदशीला मध्य प्रदेशातील एका तरुणानेही बाईक खरेदी केली, परंतु बाईकचं पेमेंट त्याने सुट्ट्या पैशांच्या रुपात (Coins for Honda Activa payment) केलं. पैसे मोजता मोजता शोरुममधील कर्मचाऱ्यांना अक्षरशः एसीमध्येही घामटं फुटलं.

राकेश कुमार गुप्ता याने ‘होंडा अॅक्टिव्हा 125 BS-VI’ ही बाईक खरेदी केली. बाईकचे पैसे भरताना हल्ली कोणीही चेक किंवा ऑनलाईन पेमेंटचा मार्ग निवडतं. अगदीच कॅश नेली, तरी पाचशे किंवा दोन हजाराच्या नोटांवाचून गत्यंतर नाही. परंतु धनत्रयोदशीला बाईक खरेदी करण्यासाठी गेलेल्या राकेशकुमारने चक्क सुट्टी नाणी नेली. ‘फायनॅन्शियल एक्स्प्रेस’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

मध्य प्रदेशातील सटणा जिल्ह्यातील सटणा शहरात राहणारा राकेश बाईक खरेदीसाठी गेला होता. शोरुममध्ये शिरतानाच त्याला पाहून कर्मचारी अवाक झाले. कारण अॅक्टिव्हाचे सत्तर हजार रुपये भरण्यासाठी त्याने सुट्टे पैसे सोबत आणले होते. नाण्यांनी भरलेल्या पिशव्या पाहून कर्मचाऱ्यांना क्षणभर काही कळेना, मात्र हे पैसे गुप्ताने पेमेंटसाठी आणले आहेत, हे समजताच सर्व जण हैराण झाले.

हिरोच्या इलेक्ट्रॉनिक स्कूटरवर 3 हजार रुपयांची सूट

नाणी मोजायला लागू नयेत, म्हणून कर्मचाऱ्यांची पांगापांग झाली. मात्र मॅनेजरनी सर्वांना बोलावलं आणि नाणी मोजण्याच्या कामासाठी बसवलं. मुख्यत्वे पाच आणि दहा रुपयांच्या नाण्यांचा समावेश असल्याने सर्वांना त्यातल्या त्यात दिलासा मिळाला. सर्व कर्मचाऱ्यांनी एकदा नव्हे, तर दोन वेळा नाण्यांची मोजदाद केली. या ‘मोजामोजी’ला (Coins for Honda Activa payment) तीन तास लागले. सर्व सोपस्कार पार पडल्यावर कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात पडला आणि त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

‘दिवाळी हा माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी सर्वात महत्त्वाचा सण आहे. प्रवास सोपा व्हावा म्हणून या धनत्रयोदशीला आम्ही बाईक खरेदी करण्याचं ठरवलं. धनत्रयोदशीला धनाचं महत्त्व असल्यामुळे नाण्यांच्या स्वरुपात संपूर्ण रक्कम दिली’ असं राकेशकुमार गुप्ताने सांगितलं.

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI