मुंबईकरांनो घरातून बाहेर पडताना सावध, CSMT स्थानकात शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्री १५ तासांचा विशेष ब्लॉक, तब्बल ५९ लोकल आणि ३ मेल गाड्या रद्द
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात लांबपल्ल्याच्या गाड्या सुटणाऱ्या ठिकाणी आज रात्री आणि उद्या असे दोन तासांचे विशेष ब्लॉक घेतले जाणार आहेत. त्यामुळे घरातून प्रवास करताना योग्य काळजी घ्यावी लागणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून लांबपल्ल्यांच्या गाड्यांसाठी फलाटांच्या विस्तारीकरणासाठी कामासाठी दोन दिवस १५ तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी स्थानकात लांबपल्ल्याच्या २४ डब्यांच्या रेल्वे गाड्यांसाठी फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरासंदर्भात प्री नॉन- इंटरलॉकिंग काम पूर्ण करण्यासाठी दोन दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे
मुंबईत उद्या आणि परवा शुक्रवारी-शनिवारी ५ तासांचा आणि शनिवारी-रविवारी रात्री १० तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या तब्ब्ल ५९ लोकल रद्द आणि ३ लांबपल्ल्याच्या मेल – एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या जाणार आहेत. सीएसएमटीच्या फलाट क्रमांक १२ आणि १३ फलाटांची लांबी २४ डब्यांच्या गाड्या चालवण्यासाठी वाढविण्यात येत आहेत. फलाट विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाचा शेवटचा टप्पा सक्रीय होण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. सिग्नल आणि इतर यंत्रणांचे प्री नॉन-इंटरलॉकिंग काम पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने हा पंधरा तासांचा मेगाब्लॉक दोन दिवस घेणार आहे.
मध्य रेल्वेचा तब्बल १५ तासांचा मेगाब्लॉक
मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर लांबपल्ल्यांच्या गाड्या सुटतात त्या फलाटांची लांबी वाढविण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहचले आहे. या कामावर अंतिम हात फिरविण्यासाठी सिंग्नल आणि इतर तांत्रिक कामे करण्यासाठी दोन ब्लॉक विभागून घेण्यात येणार आहेच. यामध्ये पहिला ५ तासांचा ब्लॉक शुक्रवार रात्री ११.३० ते शनिवारी पहाटे ४.३० वाजेपर्यंत सीएसएमटी ते भायखळा अप आणि डाऊन जलद मार्गावर घेतला जाणार आहे. तर दुसरा १० तासांचा ब्लॉक शनिवारी रात्री ११.१५ ते रविवारी सकाळी ९.१५ वाजेपर्यंत असणार आहे. या ब्लॉक काळात तब्बल ५९ लोकल आणि ३ मेल एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
शेवटची लोकल
सीएसएमटी स्थानकावरून शनिवारी सुटणारी शेवटची लोकल सीएसएमटी – ठाणे धीमी लोकल ही रात्री 10.46 वाजता सुटणार आहे. तर शेवटची जलद लोकल रात्री 10.41 वाजता सीएसएमटी – बदलापूर असणार आहे. हार्बर मार्गावरील सीएसएमटीहून सुटणारी शेवटची पनवेल लोकल रात्री 10.34 वाजता सीएसएमटीहून पनवेलसाठी सुटेल, तर रात्री 11.24 वाजता सीएसएमटी – गोरेगाव लोकल धावणार आहे.
