गरबा आणि दांडिया खेळण्यासाठीही आधार सक्ती करा, बजरंग दलाची मागणी

गरबा आणि दांडिया खेळण्यासाठीही आधार सक्ती करा, बजरंग दलाची मागणी

यंदा गरबा आणि दांडियाच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांना आधार कार्ड (Aadhar card compulsion during Garba) अनिवार्य करावे अशी मागणी बजरंग दलाने केली आहे.

Namrata Patil

| Edited By: अनिश बेंद्रे

Sep 29, 2019 | 3:19 PM

हैद्राबाद : नवरात्रीमध्ये ठिकठिकाणी गरबा आणि दांडियाच्या कार्यक्रमाचे आयोजन (Aadhar card compulsion during Garba) केले जाते. मात्र या कार्यक्रमात हिंदू धर्मांव्यतिरिक्त अनेकजण सहभागी होतात. अशा या हिंदू धर्मीयांना गरबा खेळण्यास रोखण्यासाठी यंदा गरबा आणि दांडियाच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांना आधार कार्ड (Aadhar card compulsion during Garba) अनिवार्य करावे अशी मागणी बजरंग दलाने केली आहे.

देशात ज्या ज्या ठिकाणी गरब्याचे आयोजन केले असेल, त्या ठिकाणच्या आयोजकांनी हिंदू धर्माशिवाय कोणत्याही व्यक्तींना गरबा खेळण्यासाठी परवानगी देऊ नये. तसेच हिंदू धर्मांव्यतिरिक्त व्यक्तींना ओळखण्यासाठी प्रवेश स्थळावर आधार कार्डाची सक्ती (Aadhar card compulsion during Garba) करावी असे पत्र बजरंग दलाने आयोजकांना दिले आहे.

गेल्या काही वर्षांपासून गरबा किंवा दांडिया या उत्साहाच्या कार्यक्रमात हिंदू धर्म व्यक्तीरिक्त अनेक जण सहभागी होतात. ही लोक महिलांचा अपमान करतात, त्यांची छेड काढतात. हे सर्व गैरप्रकार रोखण्यासाठी आधार कार्डची  सक्ती करावी, असेही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

इतकचं नव्हे तर अनेक ठिकाणी बजरंग दलाची कार्यकर्तेही हजर राहणार आहेत. तसंच जर एखाद्या ठिकाणी अशाप्रकारे कोणताही प्रकार घडला, तर त्या ठिकाणी तात्काळ कारावाई केली जाईल. तसेच त्या गरब्याचे आयोजनही रद्द केले जाईल अशा इशाराही बजरंग दलाने दिला आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें