उन्होंने मेरी सूरत बदली, मेरा मन नहीं, दीपिकाच्या ‘छपाक’चा काटा आणणारा ट्रेलर

अॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर 'छपाक' हा चित्रपट आधारित आहे

उन्होंने मेरी सूरत बदली, मेरा मन नहीं, दीपिकाच्या 'छपाक'चा काटा आणणारा ट्रेलर


मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असलेला, अॅसिड हल्ला पीडितेच्या संघर्षाची कहाणी सांगणाऱ्या ‘छपाक’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज (Chhapaak Official Trailer) झाला आहे. दीपिकाचा परिपक्व अभिनय, अंगावर काटा आणणारे संवाद आणि मेघना गुलजार यांचं वास्तववादी दिग्दर्शन ही या ट्रेलरची जमेची बाजू आहे.

अॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित असला, तरी दीपिका साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचं नाव ‘मालती’ आहे. मार्च महिन्यात दीपिकाचा फर्स्ट लूक रिव्हील झाला होता, तेव्हाच प्रेक्षकही अवाक झाले होते. दीपिकासोबत अभिनेता विक्रांत मस्सी यामध्ये लीड रोलमध्ये दिसत आहे.

दीपिकाने आपल्या करिअरमधील सर्वात आव्हानात्मक भूमिका साकारत असल्याचं म्हटलं जातं. लग्नानंतर प्रदर्शित होणारा दीपिकाचा हा पहिलाच चित्रपट आहे. याआधी जानेवारी 2018 मध्ये दीपिकाने ‘पद्मावत’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर नोव्हेंबर 2018 मध्ये ती अभिनेता रणवीर सिंहसोबत विवाहबंधनात अडकली. दरम्यानच्या काळात ‘झिरो’ चित्रपटातील पाहुण्या कलाकाराची व्यक्तिेरखा वगळता ती मोठ्या पडद्यावर दिसली नाही.

‘छपाक’ हा चित्रपट 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच अजय देवगन-काजोल यांच्या ‘तान्हाजी’ चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर छपाकची टक्कर (Chhapaak Official Trailer) होईल.

कोण आहे लक्ष्मी अग्रवाल?

‘छपाक’ सिनेमा लक्ष्मी अग्रवाल या अॅसिड हल्ला पीडितेच्या जीवनावर आधारित आहे. लक्ष्मीवर 2005 मध्ये एका तरुणाने अॅसिड फेकले होते. लग्नासाठी नकार दिल्याने लक्ष्मीवर अॅसिड हल्ला करण्यात आला होता. मात्र या हल्ल्यानंतर न खचता लक्ष्मीने कायद्याने लढाई दिली. लक्ष्मीमुळे स्थानिक दुकानात अॅसिड, केमिकलच्या विक्रीवर बंदी आणणारा कायदा भारतात लागू करण्यात आला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI