‘नशीब हे बलात्कारासारखं! सहन होत नसेल, तर आनंद लुटा!’

काँग्रेस खासदार हिबी ईडन यांची पत्नी अॅना यांनी 'नशीब हे बलात्कारासारखं असतं, तुम्हाला ते सहन करता येत नसेल, तर आनंद लुटा', अशा आशयाची फेसबुक पोस्ट लिहिली होती.

'नशीब हे बलात्कारासारखं! सहन होत नसेल, तर आनंद लुटा!'
Follow us
| Updated on: Oct 23, 2019 | 8:33 AM

तिरुअनंतपुरम : नशीब हे बलात्कारासारखं असतं, तुम्हाला ते सहन करता येत नसेल, तर आनंद लुटा, अशा आशयाची फेसबुक पोस्ट लिहिल्यामुळे केरळातील खासदाराची पत्नी (Congress MP’s wife Facebook Post) वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. काँग्रेस खासदार हिबी ईडन यांची पत्नी अॅना यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट लिहिली होती.

अॅना लिंडा इडन यांनी मंगळवारी सकाळी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला होता. सोबत आपले पती आणि काँग्रेस खासदार हिबी ईडन यांचा फोटो होता. त्यावर, ‘नशीब हे बलात्कारासारखं असतं, तुम्हाला जर सहन करता येत नसेल, तर त्याचा आनंद लुटा’ असं कॅप्शन अॅना यांनी या फोटोला दिलं.

अॅना यांची पोस्ट काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि नेटिझन्सनी त्यांना उथळ शेरेबाजीबद्दल चांगलंच सुनावलं. कोच्चीमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचून उद्भवलेल्या स्थितीची खिल्ली उडवल्याबद्दलही अॅना यांच्यावर टीका झाली आहे.

दुकानाचं शटर बंद करुन प्रेयसीचा गळा चिरला, हत्येनंतर प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न

सोशल मीडियावर टीकेची झोड उठल्यानंतर अॅना यांनी फेसबुक पोस्ट डिलीट (Congress MP’s wife Facebook Post) केली, त्याचप्रमाणे भावना दुखावल्याबद्दल सर्वांची सपशेल माफीही मागितली.

अॅना यांच्या पोस्टमध्ये खाली वाचा इंग्रजीत भाषांतर :

हिबी इडन हे केरळमधील एर्नाकुलम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. याआधी ते काँग्रेसचे आमदार होते, मात्र पहिल्यांदाच खासदारपदी निवडून आले आहेत.

याआधी, सीबीआयचे माजी संचालक रणजित सिन्हा यांनीही बलात्काराविषयी अशाच प्रकारचं थिल्लर वक्तव्य केलं होतं. सट्टेबाजीचं उदाहरण देताना ‘बलात्कार थांबवता येत नसेल, तर तुम्ही त्याचा आनंद लुटता’ असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यावेळीही जोरदार टीका झाल्यानंतर सिन्हा यांनी खेद व्यक्त केला होता.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.