राज्यात एकाच वेळी 11 हजार कैद्यांना पॅरोल, जगभरात कोरोनामुळे पहिल्यांदाच घडणाऱ्या 10 गोष्टी

कोरोनामुळे जगभरात कधीही न घडलेल्या गोष्टी घडत असल्याचे पाहायला मिळत (Corona 10 Interesting things) आहे. 

राज्यात एकाच वेळी 11 हजार कैद्यांना पॅरोल, जगभरात कोरोनामुळे पहिल्यांदाच घडणाऱ्या 10 गोष्टी
Follow us
| Updated on: Mar 27, 2020 | 10:15 PM

नवी दिल्ली : जगभरात कोरोना विषाणू प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत (Corona 10 Interesting things) आहे. चीन, इटली, अमेरिका यासारख्या असंख्य देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे भारतातही कोरोना रुग्णांची आकडा 500 पार गेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला महामारी म्हणून घोषित केलं आहे. तसेच ही जगासाठी आरोग्यविषय आणीबाणी असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे जगभरात त्यावर उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र कोरोनामुळे जगभरात कधीही न घडलेल्या गोष्टी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

जगभरात कोरोनामुळे पहिल्यांदाच घडत असलेल्या 10 अनोख्या गोष्टी

1. अमेरिकेत मॉलमध्ये एक महिला शिंकल्यामुळे तिथल्या दुकान मालकानं तब्बल 26 लाखांचा माल फेकून दिला आहे. सीएनएननं ही बातमी दिली आहे. अमेरिकेच्या पेन्सिल्वेनियामध्ये ही घटना घडली. संबंधित महिला बेकरी आणि इतर काही वस्तूंवर शिंकली होती. त्यानंतर दुकानातून बेकरीचा संपूर्ण स्टॉक फेकून देण्यात आला. दुकानदाराच्या तक्रारीनंतर महिलेला पोलिसांच्या ताब्यातही दिलं गेलं. अमेरिकेत लॉकडाऊन असलं तरी काही जीवनावशय्क गोष्टींचे स्टोर्स सुरु आहेत. त्यामुळे ज्यांना सर्दी किंवा खोकला आहे, त्यांच्यापासून आपणही लांब राहणं गरजेचं आहे.

2. कोरोनाच्या चाचणीसाठी स्पेननं चीनकडून खरेदी केलेल्या किटवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. काही किट्सनं चुकीचे निष्कर्ष दिल्याचा दावा स्पेनकडून केला जातो आहे. त्यामुळे काही संशयितांची पुन्हा तपासणी होण्याची शक्यता आहे. बिजनेस इनसाईडर या वेबपोर्टलनंही ही बातमी दिली आहे. दरम्यान, स्पेन सरकारनं चीनी किट्सचा वापर थांबवलं असल्याचंही सांगितलं जातं आहे. चायना मेड किट फक्त 10 ते 15 मिनिटांत कोरोनाचा रिपोर्ट देत असल्याचा दावा चीनकडून केला जातो आहे. स्पेननं याआधी चीन आणि दक्षिण कोरियाकडून 6 लाख 40 हजार कोरोना किट खरेदी केले आहेत.

3. शस्रं आणि दारुगोळा बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये केंद्र सरकारनं मास्क आणि व्हेंटिलेटर बनवण्याचे आदेश दिले आहेत. सैन्यासाठी शस्र बनवणाऱ्या कारखाने पहिल्यांदाच असं काम करणार आहेत. दैनिक लोकमतनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे. आपत्कालीन स्थितीत जगातल्या कोणत्याही सरकारला, शासकीय आणि खासगी कंपन्या अधिग्रहित करण्याचा अधिकार आहे. युद्धाच्या वेळेसही इतर अनेक कंपन्यांमध्ये मेडिकल उपकरणं चार पटीनं उत्पादीत केली जातात.

4. लॉकडाऊनचे नियम तोडले तर स्पेनमध्ये भारतीय चलनानुसार तब्बल ५ कोटींचा दंड वसूल केला जाणार आहे. लॉकडाऊनमध्येही अनेक जण नियम तोडत असल्यामुळे स्पेननं कडक पावलं उचलली आहेत. आतापर्यंत स्पेनमध्ये 30 हजार लोकांकडून दंड वसूल केला गेला आहे. युरोपियन देशात बहुदा गंभीर गुन्ह्यांव्यक्तिरिक्त पहिल्यांदात इतका मोठा दंड आकारला जातो आहे. इटलीतही जर लॉकडाऊनचे नियम तोडले तर अडीच लाख आणि इजिप्तमध्ये 20 हजारांचा दंड वसूल केला जातो आहे.

5. आसाममध्ये कोरोनाबाधितांसाठी देशातलं पहिलं सर्वात मोठं रुग्णालय उभं राहतंय. १ हजार बेडची या रुग्णालयात व्यवस्था असणार आहे. ओडिशा सरकार, काही उद्योजक आणि महाविद्यालय यांच्या पुढाकारानं हॉस्पिटलचं बांधकाम सुरु होणार आहे. याशिवाय केंद्र सरकारनं निमलष्करी दलाची 32 दवाखानेही कोरोनाबाधितांसाठी ताब्यात घेतली आहेत. त्यामुळे तिथंही एकूण 1900 बेडची व्यवस्था होणार आहे. सीआरपीएफ, बीएसएफ यांचे महाराष्ट्रात पुणे आणि नागपूर याठिकाणी रुग्णालयं आहेत.

6. तुरुंगामध्ये कोरोनाची लागण होऊ नये म्हणून महाराष्ट्रातल्या तब्बल 11 हजार कैद्यांना पॅरोल आणि जामिनावर सोडलं जाणार आहे. एकाच वेळेला 11 हजार कैद्यांना पॅरोल देण्याची ही पहिलीच वेळ आहे. तुरुंगात कमीत-कमी कैदी असावेत, हा यामागचा हेतू आहे. ७ वर्ष किंवा त्याहून कमी शिक्षेचे कैदी यांनाच पॅरोल आणि जामिनावर सोडण्यात येणार आहे. मात्र टाडा, पॉक्सो, आर्थिक गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगणारे या कैद्यांची मात्र सुटका केली जाणार नाही.

7. महिंद्रा कंपनीनं फक्त 48 तासात व्हेंटिलेटरचं मॉडेल तयार करुन दाखवलंय. आरोग्य यंत्रणेसाठी ही मोठी दिलाश्याची गोष्ट समजली जातेय. इगतपुरी आणि मुंबईत महिंद्राच्या २ मोठ्या कंपन्या आहेत. ज्याठिकाणी कार बनवल्या जातात. मात्र आनंद महिंद्रांनी स्वतःहून पुढे येत कोरोनाविरोधात आपल्या कंपनीत वेंटिलेटर बनवण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे साधारणपणे वेंटिलेटरची किंमत 5 ते 10 लाखांपासून सुरु होते. मात्र वेंटिलेटरचं प्रारुप तयार करण्यासाठी फक्त 7500 रुपये खर्च झाल्याचं सांगितलं जातं आहे.

8. रामायण आणि महाभारताबरोबरच दूरदर्शनवरुन शक्तीमान ही गाजलेली मालिका पुन्हा दाखवण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली आहे. लहान मुलांना बाहेर न पडू देता, घरातच ठेवणं हा पालकांसाठी मोठा टास्क आहे. त्यामुळे रामायण किंवा महाभारताबरोबरच लहान मुलांसाठी शक्तीमान मालिका सुरु केली, तर मुलांची चिडचिड काही प्रमाणात कमी होईल असं सांगितलं जातं आहे. दरम्यान, रामायण ही मालिका 28 तारखेपासून रोज सकाळी 9 ते 10 आणि रात्री 9 ते 10 या दरम्यान दाखवली जाणार आहे.

9. कोरोनामुळे कर्जदारांकडून 3 महिन्यांपर्यंत हफ्ते घेऊ नका, असा सल्ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं देशातल्या बँकांना दिला आहे. तो सल्ला जर बँकांनी अमलात आणला, तर देशातली ही पहिलीच घटना असणार आहे. मात्र बँकांनी जरी ईएमआयसाठी 3 महिने मुदतवाढ दिली, तरी त्याचा अर्थ, हफ्ते माफ होतील असा नाही. त्या मोबदल्यात बँका 3 महिन्यानंतरचे काही हफ्ते वाढवून देऊ शकतात किंवा मग तुमच्या कर्जाच्या परतफेडीचा अवधीमध्ये वाढ होऊ शकते.

10. साताऱ्यात 14 महिन्यांच्या बाळाला कोरोना संशयित म्हणून रुग्णालयात दाखल केलंय. दैनिक पुढारीनं ही बातमी दिलीय. बहुदा महाराष्ट्रातलही ही पहिलीच घटना असावी. त्यामुळे लहान मुलांसाठी पालकांनी विशेष खबरदारी घेणं गरजेचं आहे. बाळाची आई सोडून घरातले इतर निरोगी असले, तरी  त्यांनी लहान मुलांपासून ठराविक अंतर ठेवणं गरजेचं असल्याचं आवाहन करण्यात येतंय.

संबंधित बातम्या:

कोरोनामुळे जगात पहिल्यांदाच घडत आहेत ‘या’ दहा गोष्टी

‘जनता कर्फ्यू’ आणि ‘कोरोना’बाबत 10 विलक्षण गोष्टी

दारुऐवजी सॅनिटायझरची निर्मिती, जगभरात कोरोनामुळे पहिल्यांदाच घडणाऱ्या 10 गोष्टी

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.