राज्यात 60 कारागृहातील कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय, आणखी 7 हजार कैद्यांना सोडणार : गृहमंत्री

राज्यात 60 कारागृहातील कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय, आणखी 7 हजार कैद्यांना सोडणार : गृहमंत्री

उर्वरित कैद्यांनाही लवकरच सोडलं जाणार आहे, असे गृहमंत्र्यांनी 'टीव्ही 9 मराठी'शी बोलताना सांगितले. (Corona Effect Prisoner release from Jail)

Namrata Patil

|

Jun 07, 2020 | 5:10 PM

पुणे : लॉकडाऊनच्या काळात आतापर्यंत तब्बल तीन हजार पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 30 पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांवर चांगल्या उपचार करण्याची सूचना दिल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यातील कारागृहातून आतापर्यंत दहा हजार हजार कैद्यांना इमर्जन्सी पॅरोलवर सोडण्यात आलं आहे. तर उर्वरित कैद्यांनाही लवकरच सोडलं जाणार आहे, असे गृहमंत्र्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना सांगितले. (Corona Effect Prisoner release from Jail)

पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहातील कोवीड सेंटरला गृहमंत्र्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी बंदोबस्तावरील पोलीस, अधिकाऱ्यांची अस्थेवाईक चौकशी ही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.

राज्यातील 60 कारागृहातील अंडर ट्रायल कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कारागृहात 38 हजार कैदी असून त्यातील 17 हजार कैद्यांना कमी करायचे आहे. यात आतापर्यंत 10 हजार कैद्यांना इमर्जन्सी पॅरोलवर सोडण्यात आलं आहे. तर पुढील 7 हजार कैद्यांना लवकरच सोडणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं.

लॉकडाऊनच्या काळात आतापर्यंत तब्बल 3 हजार पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 30 पोलिसांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांवर चांगल्या उपचार करण्याची सूचना दिल्याचा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. तर दाऊद प्रकरणी संपूर्ण माहिती आल्यानंतर सविस्तर सांगितले जाईल, असेही गृहमंत्र्यांनी यावेळी म्हटलं.

तर राज्यात तब्बल 37 हजार पोलिसांना सॉफ्ट ड्युटी दिली आहे, असे अनिल देशमुख यांनी सांगितलं. राज्यात 50 ते 55 वर्षावरील 23 हजार पोलीस आहेत. या पोलिसांना स्टेशनची ड्युटी दिली. त्यांना बंदोबस्त किंवा आयसोलेशनची ड्युटी दिलेली नाही. तर 55 वर्षावरील 12 हजार पोलिसांना घरीच पगार देत असल्याचे गृहमंत्र्यांनी (Corona Effect Prisoner release from Jail) सांगितलं.

संबंधित बातम्या : 

पुण्यात माजी आमदार मेधा कुलकर्णींवर दारुड्यांचा हल्ला, हाताची बोटे फ्रॅक्चर

खरंच दाऊदचा कोरोनाने मृत्यू झालाय का? गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात….

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें