AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात माजी आमदार मेधा कुलकर्णींवर दारुड्यांचा हल्ला, हाताची बोटे फ्रॅक्चर

दारु पिण्यास बसलेल्या युवकांनी जाब विचारल्याच्या रागातून पुण्यात भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णींसह तिघांना मारहाण केल्याचा आरोप आहे. (Pune Ex BJP MLA Medha Kulkarni attacked by goons)

पुण्यात माजी आमदार मेधा कुलकर्णींवर दारुड्यांचा हल्ला, हाताची बोटे फ्रॅक्चर
फाईल फोटो
| Updated on: Jun 07, 2020 | 2:15 PM
Share

पुणे : पुण्यात भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर दारुड्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हल्ल्यात मेधा कुलकर्णी यांच्या हाताची बोटे फ्रॅक्चर झाली आहेत. शनिवारी सायंकाळी मारहाण झाली असून चौघा जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अमर  बनसोडे आणि विनोद गेंदेला अटक करण्यात आली, तर तेजस कांबळे आणि मिथुन हरगुडे फरार आहेत. (Pune Ex BJP MLA Medha Kulkarni attacked by goons)

पुण्यात कोथरुड परिसरातील सहजानंद सोसायटीजवळ हा प्रकार घडला. दारु पिण्यास बसलेल्या युवकांनी जाब विचारल्याच्या रागातून कुलकर्णींसह तिघांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

दारुड्यांनी सुरुवातीला सहजानंद सोसायटीतील रहिवासी विलास कोल्हे आणि राहुल कोल्हे यांच्यावर हल्ला केला. विलास कोल्हे कुत्र्याला घेऊन बाहेर गेले होते. त्यावेळी दारुड्यांनी आमच्यावर कुत्रा का सोडता, असं विचारत मारहाण केली.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर माजी आमदार मेधा कुलकर्णी घटनास्थळी आल्या. त्यावेळी आरोपींनी त्यांच्यावरही हल्ला केल्याची माहिती आहे. हल्ल्यात कुलकर्णी यांच्या हाताची बोटे फ्रॅक्चर झाली आहेत.

मुख्य आरोपीसह दोघे जण फरार आहेत तर दोघांना अटक केली आहे. कुलकर्णी यांच्यावर हल्ला करणारे फरार आहेत. या प्रकरणी कलम 354 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेधा कुलकर्णी कोण आहेत?

मेधा कुलकर्णी यांनी कोथरुड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. 2014 मध्ये कोथरुडमधून मेधा कुलकर्णींनी शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांच्याविरुद्ध 64 हजार मतांनी विजय मिळविला होता. (Pune Ex BJP MLA Medha Kulkarni attacked by goons)

2019 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचं तिकीट कापून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळे कुलकर्णींचं पुनर्वसन कुठे होणार, याकडे लक्ष लागून राहिलं.

विधानपरिषदेचीही उमेदवारी डावलल्याने आमदार मेधा कुलकर्णी नाराज झाल्या होत्या. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी अनेक वेळा मला विधानपरिषदेवर पाठवणार असल्याचं जाहीर सांगितलं होतं, असं सांगताना मेधा कुलकर्णींना अश्रू अनावर झाले होते.

मी पक्षाशी बांधील असून कुठे जाणार नाही, मी पक्ष सोडून अक्राळविक्राळ स्वरुप धारण करणार नाही, हाच माझा कमकुवतपणा असेल असं त्यांना वाटत असल्याची शंका मेधा कुलकर्णींनी त्यावेळी व्यक्त केली होती.

(Pune Ex BJP MLA Medha Kulkarni attacked by goons)

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.