देशात ‘कोरोना’ संसर्गाचा वाढलेला वेग कायम, 3 दिवसात 10 हजार नवे रुग्ण

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार 7 मे रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत देशात 3 हजार 601 रुग्ण वाढले आहेत.

देशात 'कोरोना' संसर्गाचा वाढलेला वेग कायम, 3 दिवसात 10 हजार नवे रुग्ण

मुंबई : कोरोना संसर्गाचा वाढलेला वेग (Corona Transmission Rate) अद्यापही कायम आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी साडे तीन हजारांपेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढला आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, 7 मे रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत गेल्या 24 तासात देशात 3 हजार 601 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे देशात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 53 हजार 182 वर (Corona Transmission Rate) पोहोचली आहे.

कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक कसा आणि कितीने वाढला?

– 10 हजारहून 20 हजार रुग्ण 8 दिवसांत झाले

– 20 हजारांहून 30 हजार रुग्ण होण्यासाठी 7 दिवस लागले

– 30 हजाराहून 40 हजार रुग्ण 5 दिवसांत झाले

– 40 हजाराहून 50 हजार रुग्ण होण्यासाठी अवघे 3 दिवस लागले

म्हणजेच गेल्या 3 दिवसांत कोरोनाबाधितांच्या संख्येत 10 हजार नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर जून महिन्यापर्यंत कोरोना रुग्णांमध्ये वाढ होईल, असं दिल्लीच्या एम्सच्या प्रमुखांनी म्हटलं आहे.

ज्या प्रकारे संसर्गाचा वेग दिसतो आहे, त्यानुसार जूनमध्ये संसर्ग आणखी वाढलेला असेल. एकाच झटक्यात कोरोना संपणार नाही. जूनच्या अखेरीस रुग्णांची संख्या कमी होण्यास सुरुवात होईल, असं सांगितलं जात आहे.

9 देशातल्या 10 शहरातून 2,300 भारतीय भारतात परतणार

इकडे परदेशात अडकलेल्यांसाठी विमानांचं उड्डाण झालं. परदेशात अडकलेल्या भारतीयांसाठी वंदे भारत मिशन सुरु झालं. एकूण 12 देशातून 64 विमानांद्वारे 14 हजार 800 नागरिकांना भारतात आणलं जाणार आहे. 1990 च्या खाडीच्या युद्धानंतरचं हे सर्वात मोठं ऑपरेशन आहे. काही तासांतच एकूण 9 देशातल्या 10 शहरातून 10 विमानांद्वारे 2,300 भारतीय भारतात परतणार आहेत. (Corona Transmission Rate)

गोरगरिबांची आणि गरजुंना मदत करा : पंतप्रधान मोदी

बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेशी संवाद साधला. भगवान बुद्धांनी जगाला सेवेचा संदेश दिला. कोरोनाच्या संकटातही बुद्धांच्या पावलावर पाऊल ठेवत आज भारत सर्वांना मदत करत आहे. त्यामुळे न थकता गोरगरिबांची आणि गरजुंना मदत करा, असं आवाहनही मोदींनी केलं.

BSF च्या दोन जवानांचा कोरोनामुळे मृत्यू

BSF च्या दोन जवानांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग पोलिसांपासून ते लष्करी जवानांपर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत एकूण 154 BSF चे जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. संसर्ग झालेल्यांमध्ये दिल्लीत सुरक्षेसाठी तैनात असलेले 60 पेक्षा अधिक जवान आहेत. तर त्रिपुरातही 37 जवानांना कोरोना झाला आहे.

तामिळनाडूत लॉकडाऊनमध्ये दारु विक्रीला डीएमकेचा विरोध

तामिळनाडूत दारुच्या विक्रीसाठी परवानगी दिल्याचा विरोध करत डीएमकेने आंदोलन केलं. डीएमके प्रमुख एम के. स्टॅलिन यांनी चेन्नईत काळे झेंडे हाती घेत दारु विक्रीच्या निर्णयाचा विरोध केला. 4 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित असताना दारुची दुकानं उडण्याचा निर्णय मूर्खपणाचा असून गरिबांना मदत करण्याची मागणी स्टॅलिन यांनी केली.

पंजाबमध्ये दारु विक्रीला अनोखा विरोध, दारु घेण्यापूर्वी लोकांना दुधाचं वाटप

पंजाबमध्येही लॉकडाऊनमध्ये दारु विक्रीचा निर्णय घेण्यात आल. याच निर्णयाचा विरोध करत युवा अकाली दलाकडून मोफत दुधाचं वाटप करण्यात आलं. दारुची दुकानं उघडण्याआधीच दुकानाच्या पायऱ्यांवर बसून लोकांना एक एक कप दुधांचं वाटप केलं.

Corona Transmission Rate

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाचा विळखा वाढताच, दिवसभरात 1,216 नवे रुग्ण, आकडा 17,974 वर

ऑर्थर रोड जेलमध्ये 26 कर्मचारी आणि 78 कैद्यांना कोरोना

Pune Corona | कोरोनामुक्त बाळंतीण 21 दिवसांनी घरी, दोन वृद्धांचीही मात

Nagpur Corona | तुकाराम मुंढेंच्या निर्णयामुळे नागपुरात मोठा धोका टळला

Published On - 1:03 am, Fri, 8 May 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI