Corona Virus | मुंबई, पुणे, नागपुरातील व्यवहार ठप्प, राज्यातील 10 शहरं लॉक डाऊन

मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर यांसह जवळपास 12 शहरांचे (Mumbai Pune Nagpur ShutDown) व्यवहार आजपासून (21 मार्च) पुढील 10 दिवस ठप्प झाले आहेत.

Corona Virus | मुंबई, पुणे, नागपुरातील व्यवहार ठप्प, राज्यातील 10 शहरं लॉक डाऊन

पुणे : मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर यांसह जवळपास 10 शहरांचे (Mumbai Pune Nagpur ShutDown) व्यवहार आजपासून (21 मार्च) पुढील 10 दिवस ठप्प झाले आहेत. या शहरांमध्ये अन्नधान्य, दूध, औषधे यासारख्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने आणि कार्यालयांना टाळे लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. तर सरकारी कार्यालयातील 25 टक्के कर्मचारी उपस्थिती आहे.

मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अहमदनगर, (Mumbai Pune Nagpur ShutDown) यवतमाळ, रत्नागिरी, औरंगाबाद, उल्हासनगर या ठिकाणी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले होते. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई, MMRD, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरांमध्ये जीवनावश्यक वस्तूं व्यतिरिक्त सर्व दुकानं, सर्व कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद राहतील, असे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच सर्व शहरांमध्ये लॉक डाऊनची स्थिती पाहायला मिळाली.

कुठे काय चालू राहणार

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर येथे 31 मार्चपर्यंत खासगी ऑफिस आणि दुकानं बंद राहणार आहे. यावेळी अत्यावश्यक सेवा म्हणजेच बँका, सार्वजनिक वाहतूक, बाजारपेठा, किराणा मालाचे दुकान, दुधाचे दुकान, रुग्णालये, छोटे रेस्टॉरंट सुरु राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा सोडून सरकारकडून इतर सर्व अनावश्यक गोष्टी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारी कार्यालयात कर्माचारी 25 टक्के कर्मचारी

सरकारी कार्यालयातील कर्मचारी 50 टक्क्यावरुन 25 टक्क्यावर आणली आहे. शक्य तिथे वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या खासगी कंपन्यांना जे शक्य नाही त्या कंपन्या बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

लोकल-बेस्ट सुरु

रेल्वे आणि बस मुंबई शहराच्या रक्तवाहिन्या आहेत, त्या बंद करणे सोपे आहे, परंतु पालिका, स्वच्छता, आरोग्य अशा अत्यावश्यक कर्मचारीवर्गाची गैरसोय होईल. त्यामुळे तूर्तास रेल्वे आणि बस सेवा बंद करणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. ज्या कारणामुळे आपण ट्रेन, बस वापरत आहोत, ती कारणं बंद केली आहेत. ऑफिस बंद झाल्याने जर लोक फिरायला जात असतील तर आम्हाला ट्रेन आणि बस बंद करावे लागतील, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

पहिली ते आठवीचे विद्यार्थी पास

महाराष्ट्रातील पहिली ते आठवीपर्यंतची परीक्षा रद्द करण्यात आल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं. तर नववी आणि अकरावीची परीक्षा 15 एप्रिलनंतर होणार आहे. दहावीच्या वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही. कालच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 29 मार्चला होणारी सीईटीची परीक्षा 30 एप्रिलला पुढे ढकलली.

आयकर रिटर्न भरण्यास मुदतवाढ?

आर्थिक वर्ष 2018-19 चे सुधारित आणि उशिराचे आयकर रिटर्न भरण्याची 31 मार्चची मुदत वाढवून द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केली आहे. 234 बी अंतर्गत व्याज वाचवण्यासाठी अग्रिम कर भरण्याची तसेच 30 एप्रिलची टीडीएस भरण्याची मुदतही वाढवून द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. फेब्रुवारी 2020 ची जीएसटी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 22 मार्च आहे. त्यालाही मुदतवाढ देण्यास मुख्यमंत्र्यांनी (Mumbai Pune Nagpur ShutDown) सुचवलं आहे.

संबंधित बातम्या : 

कोरोना vs ठाकरे सरकार : दिवसभरातील महत्त्वाचे निर्णय

मुंबई, पुणे ते नागपूर, 31 मार्चपर्यंत कुठे काय चालू राहणार?

मुंबई, पुणे ते नागपूर, 31 मार्चपर्यंत कुठे काय बंद राहणार?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI