दारु खरेदीवरुन वादावादी, टिटवाळ्यात ग्राहकाचा दुकान चालकावर कात्रीने हल्ला

दारु खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाने वाईन शॉप चालकावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.(Customer Attack on Wine shop Owner due to money issue in Titwala)

दारु खरेदीवरुन वादावादी, टिटवाळ्यात ग्राहकाचा दुकान चालकावर कात्रीने हल्ला

कल्याण : दारु खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाने वाईन शॉप चालक आणि दोन मॅनेजरवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना टिटवाळ्यात घडली आहे. अवघ्या पाचशे रुपयाच्या वादातून ही घटना घडल्याचं समोर येत आहे. सध्या पोलीस या सीसीटीव्हीच्या माध्यामातून आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती समोर येत आहे. गोविंद प्रेमप्रकाश वर्मा असे या आरोपीचे नाव असून तो उल्हासनगर या ठिकाणी राहणारा आहे. (Customer Attack on Wine shop Owner due to money issue in Titwala)

टिटवाळ्याती म्हारळ परिसरात एक वाईन शॉप आहे. त्या वाईन शॉपवर सोमवारी रात्री आठच्या सुमारास एक व्यक्ती दारू खरेदी करण्यासाठी आला. त्याने दारु खरेदी केली आणि 500 रुपये दिले असल्याचे सांगितले. मात्र दारुचे पैसे मला मिळालेच नाही, असे शॉप चालकाने त्याला सांगितले. यावरुन शॉप चालक धर्मपाल सिंग आणि त्या ग्राहकामध्ये वाद झाला. त्यानंतर तो ग्राहक घरी निघून गेला.

यानतंर तोच ग्राहक 15 मिनिटांनी हातात कात्री आणि हातोडा घेऊन पुन्हा त्या दुकानात आला. त्याने वाईन शॉपमध्ये घुसत हाणामारी सुरु केली. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटिव्हीत कैद झाली. या हल्ल्यात वाईन शॉप मॅनेजर लच्छू आहूजा यांना गंभीर दुखापत झाली. तर वाईन शॉप चालक धर्मपाल सिंग अन्य एक कर्मचारी किरकोळ जखमी झाले. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक बालाजी पांढरे यांनी आरोपीला शोधण्यासाठी एक टीम तयार केली. सीसीटीव्हीच्या सहाय्याने 48 तास या आरोपीचा शोध सुरु होतो. अखेर पोलिसांना या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. (Customer Attack on Wine shop Owner due to money issue in Titwala)

संबंधित बातम्या : 

आमदार निवास बॉम्बने उडवू, निनावी कॉलमुळे खळबळ, पोलिसांकडून शोध सुरु

ठाण्यात संपत्तीच्या वादातून सावत्र भावाची हत्या, मृतदेह वाशी खाडीत फेकला, मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI