कोकणाला ‘क्यार’चा तडाखा, किनारपट्टीवर वेगवान वाऱ्यासह पावसाच्या धारा

कोकण किनारपट्टीसह गोव्यालाही क्यार चक्रीवादळाचा तडाखा बसला (kyarr cyclone) आहे. यामुळे मालवण, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे.

कोकणाला 'क्यार'चा तडाखा, किनारपट्टीवर वेगवान वाऱ्यासह पावसाच्या धारा
Follow us
| Updated on: Oct 26, 2019 | 10:41 AM

सिंधुदुर्ग : कोकण किनारपट्टीसह गोव्यालाही क्यार चक्रीवादळाचा तडाखा बसला (kyarr cyclone) आहे. यामुळे मालवण, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी पाणी साचले असून, अनेकांच्या घरातही पाणी शिरले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ‘क्यार’ या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत चाकरमान्यांना नैसर्गिक संकटाला तोंड द्यावं लागतं (kyarr cyclone) आहे.

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत गुरुवारी (24 ऑक्टोबर) पासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. समुद्रात उंच लाटा उसळत असल्याने याचा फटका मच्छिमारांना बसला (kyarr cyclone) आहे.

क्यार चक्रीवादळ धडकल्याने कोकण किनारपट्टीवर उचं लाटा उसळत आहेत. मालवणमध्ये पावसाने हाहा:कार उडवला असून सर्व रस्ते जलमय झाले आहेत. शनिवारी (26 ऑक्टोबर) सकाळपासून मालवणमध्ये ठिकठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे काही घरांनाही पाण्याचा वेढा घातला आहे.

वादळामुळे समुद्रही खवळला आहे. खवळलेल्या समुद्राचे पाणी ही वस्तीत शिरले आहे. त्यामुळे मालवणमधील लोक भितीच्या छायेखाली (kyarr cyclone) आहेत.

राञीपासून पडणारा पाऊस आणि समुद्राला असणारी भरती यामुळे मालवण बाजारपेठेत पाणी शिरले आहे. भंडारी हायस्कूल ते भाजी मार्केट अंबिका कॉम्प्युटर, हॉटेल सागर किनारा एवढ्या भागात एक फूट पाणी साचले आहे. यामुळे मच्छिमार व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचेही पाहायला मिळत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सकाळपासून पाऊस सुरु आहे. तर किनारपट्टी भागात पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्गातही अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

क्यार चक्रीवादळाचा धोका लक्षात घेत कोकण किनारपट्टीवरील ग्रामस्थांना गरज नसल्यास घराबाहेर पडू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तर मच्छिमारांना दोन दिवस समुद्रात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. शिवाय, कोकणात येणाऱ्या पर्यटकांनाही काही दिवस कोकणात न येण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

क्यार चक्रीवादळ नेमकं काय? 

पावसाळ्यानंतर बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे पट्टे तयार होतात. त्यामुळे वादळं निर्माण होते. अशाप्रकारे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन क्यार चक्रीवादळ निर्माण झाले आहे. या वादळाचे केंद्रहे रत्नागिरी पश्चिमेकडील 190 किमीवर आहे. हे चक्रीवादळ थोडे उत्तरेकडे सरकून कोकणी किनारपट्टीच्या दिशेने सरकणार आहे. त्यानंतर क्यार चक्रीवादळ ओमनच्या दिशेने समुद्रात प्रवास करेल. या काळात त्याचे रुपांतर तीव्र अतितीव्र स्वरुपाचे होण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.