मराठी भाषिक सीमाभाग महाराष्ट्रात सामील झाल्याशिवाय राहणार नाही : अजित पवार

सीमाभागातील मराठी भाषिक बांधवांच्या लढ्याला पाठिंबा असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे.

मराठी भाषिक सीमाभाग महाराष्ट्रात सामील झाल्याशिवाय राहणार नाही : अजित पवार
Follow us
| Updated on: Nov 01, 2020 | 4:48 PM

मुंबई : सीमाभागातील मराठी भाषिक बांधवांच्या लढ्याला पाठिंबा असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. बेळगाव,  कारवार, निपाणीसह ‘संयुक्त महाराष्ट्र’ हा आपला निर्धार आहे. बेळगावसह सीमाभागातील मराठी बांधव महाराष्ट्रात सामील होण्यासाठी देत असलेल्या लढ्याला महाराष्ट्रातील प्रत्येकाचा सक्रिय पाठिंबा असल्याचं अजित पवार म्हणाले. (DCm Ajit pawar Support marathi Speaking people In Maharashtra Karnataka Border)

सीमाभागातील मराठी बांधवांच्या संघर्षाला मी देखील जाहीर पाठिंबा व्यक्त करतो. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. मराठी भाषिक सीमाभाग महाराष्ट्रात सामील झाल्याशिवाय हा संग्राम थांबणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सीमाभागातील मराठी बांधवांचा लढा सुरु आहे. महाराष्ट्रातील जनता तसंच महाराष्ट्र सरकार सीमाभागातील नागरिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याची ग्वाही अजित पवार यांनी दिली.

कर्नाटकरात मराठी बांधवांवर होणारा अन्याय, अत्याचाराचा निषेध मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला.  पार्श्वभूमीवर मुंबईत राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला.

दुसरीकडे, “आमचा मराठी माणसाचा सीमाभाग लवकरच महाराष्ट्रात सामील होईल”, अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.  राज्यातील जनता सीमा भागातील मराठी भाषिक लोकांच्या मागे पूर्ण ताकदीने उभी आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असलं तरी कर्नाटकमधील मराठी बांधवांवरील अन्याय थांबलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस त्याचा निषेध नोंदवत असल्याचं जयंत पाटील म्हणाले.

हसन मुश्रीफ, संजय राऊतांचं कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर

‘बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे. सूर्य, चंद्र असेपर्यंत तो महाराष्ट्राला कधीही मिळणार नाही, अशी दर्पोक्ती कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केली आहे. सदवी यांच्या या वक्तव्याचा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. चंद्र, सूर्य कशाला?, तुमचा उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी बेळगाव महाराष्ट्रात असेल, असं जोरदार प्रत्युत्तर हसन मुश्रीफ यांनी लक्ष्मण सदवींना दिलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही लक्ष्मण सदवी यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘सूर्य-चंद्र तर राहतीलच, आम्हाला इतरांकडून ज्ञान घेण्याची गरज नाही, त्यांनी त्यांचं पाहावं’, असा टोला राऊतांनी सवदी यांना लगावला. बेळगावातील सीमाप्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

(DCm Ajit pawar Support marathi Speaking people In Maharashtra Karnataka Border)

संबंधित बातम्या:

सूर्य चंद्राचे ज्ञान शिकवू नका, संजय राऊतांनी बेळगावप्रश्नावरुन कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले

कानडी पोलिसांचा आदेश झुगारत मराठी बांधव काळा दिन साजरा करण्यासाठी एकत्र, कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.