बोगस डॉक्टरचा हलगर्जीपणा, उपचारादरम्यान चुकीचे इंजेक्शन दिल्याने तरुणाचा मृत्यू

बोगस डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज (6 नोव्हेंबर) वसई येथे (Patient died due to bogus doctor) घडली.

बोगस डॉक्टरचा हलगर्जीपणा, उपचारादरम्यान चुकीचे इंजेक्शन दिल्याने तरुणाचा मृत्यू
Follow us
| Updated on: Nov 06, 2019 | 10:05 PM

वसई : बोगस डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज (6 नोव्हेंबर) वसई येथे (Patient died due to bogus doctor) घडली. रुग्णाला डेंग्यूची लागण झाली असताना डॉक्टरांनी उपचारादरम्यान चुकीचे इंजेक्शन दिले. यामुळे रुग्णाला इन्फेक्शन होऊन त्याचा आज मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. परदुमन निशाद असं या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव (Patient died due to bogus doctor) आहे.

परदुमन निशाद हा मुळचा उत्तर प्रदेशचा रहिवाशी आहे. कामानिमित्त तो वसईच्या वाळीव परिसरात आला होता. वाळीव येथील केटी इंडस्ट्री इस्टेटमध्ये तो काम करत होता. 3 नोव्हेंबर रोजी त्याला थंडी ताप, सर्दी, खोकला जाणवल्याने तो तेथील डॉक्टर सर्वेश सिंग या होमिओपॅथी डॉक्टरकडे गेला.

डॉक्टरांनी परदुमन याला इंजेक्शन देऊन घरी पाठवले. पण तरीही आजार बरा होण्याएवजी त्याचा आजार वाढतच गेला. त्याची प्रकृती खालावली असल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी काल (5 नोव्हेंबर) त्याला पुन्हा डॉक्टरकडे घेऊन गेले. त्यावेळी रुग्णाची अवस्था पाहून डॉक्टरांनी जवळील सिद्धीविनायक रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. रुग्णाची परिस्थिती चिंताजनक असल्याने सिद्धीविनायक रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने त्याची रक्त तपासणी केली. त्यानंतर त्याला डेंग्यू झाल्याचे निदान झाले. पण उपचार सुरु असतानाच रुग्णाचा दुर्देवी मृत्यू झाला. डॉक्टरने चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे रुग्णचा मृत्यू झाला, असा आरोप मृताच्या कुटुंबियांनी डॉक्टरांवर केला आहे.

“रुग्णाला मल्टी व्हिटॅमिनचे इंजेक्शन कंबरेत दिले होते. जोपर्यंत रक्ताची तपासणी होत नाही, तोपर्यंत कोणतेच इंजेक्शन द्यायचे नाही”, असं सिद्धिविनायक रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, या सर्व प्रकरणावर होमिओपॅथी डॉक्टर सर्वेश सिंग यांनी थेट बोगस डॉक्टरांवर सरकारने कारवाई करावी, असं सांगितले. “सरकारने याविरोधात कारवाई केली पाहिजे. मी एकटाच थोडी असं करतोय. सर्वजण हे करतात. माझी मृतासोबत थोडी दुश्मनी होती. मी तर चांगल्यासाठी इंजेक्शन दिले होते”, असं होमीओपॅथी डॉक्टर सर्वेश सिंग यांनी (Patient died due to bogus doctor) सांगितले.

बोगस डॉक्टरच्या निष्काळजीपणामूळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने नागरिकांमध्ये तीव्र संताप होत आहे. वसई, विरार, नालासोपारामध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. गल्ली बोळात हे डॉक्टर आपले दुकान थाटून लोकांच्या जीवाशी खेळत आहेत. वसई विरार महापालिकेने अशा डॉक्टरांवर कडक कारवाई करुन, त्यांना जेलमध्ये टाकावे, अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून केली आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. तबसुम काझी यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण होऊ शकला नाही.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.