नागपुरात हॉस्पिटलमधील जेवणात शेण

काही दिवसांपूर्वी याच हॉस्पिटलमध्ये एका महिलेनं स्वत: डिलेव्हरी केली होती, त्याची चौकशी सुरुच आहे. आता पुन्हा एकदा मेडिकलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय.

नागपुरात हॉस्पिटलमधील जेवणात शेण

नागपूर : नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार घडलाय. रुग्णाच्या जेवनात जनावराचं शेण आढळल्याची तक्रार नातेवाईकांनी केलीय. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडलाय. या घटनेमुळे मेडिकलमध्ये उपचार घेणाऱ्या हजारो रुग्णांच्या आरोग्यालाच धोका निर्माण झालाय.

चंद्रपूर जिल्ह्यातील उमेश पवार गेल्या दहा दिवसांपासून नागपूरच्या मेडिकलमध्ये उपचार घेत आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीही आहे. रुग्णांना मेडिकलकडून जेवनाची सोय आहे. काल सायंकाळी त्यांना पालकची डाळभाजी, भात आणि चपात्याता डबा मिळाला, त्यांनी जेवनाला सुरुवात केली. पण दोन-तीन घास घेतल्यानंतर त्यांच्या तोंडात जनावरांचं गोबर गेलंय, अशी तक्रार त्यांच्या पत्नीनं केलीय. पण या धक्कादायक प्रकारानंतर इतर रुग्णांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

पतीच्या जेवनात शेण आढळल्याने कौशल्या पवार आणि इतर रुग्णांच्या नातेवाईकांनी मेडिकल प्रशासनाकडे तक्रार केली. त्यानंतर जेवनाचे सॅम्पल्स आणि जेवनात दिसून आलेला तो घटन अन्न विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आला. चौकशीनंतर कारवाई करु, असं सरकारी उत्तर मेडिकल प्रशासनाकडून देण्यात आलंय.

काही दिवसांपूर्वी मेडिकलमध्ये एका महिलेनं स्वत: डिलेव्हरी केली होती, त्याची चौकशी सुरुच आहे. आता पुन्हा एकदा मेडिकलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. एका रुग्णाच्या जेवणात शेण आढळून आलंय. त्यामुळे मेडिकल रुग्णांवर उपचारासाठी आहे, की रुग्णांच्या जावाशी खेळ करण्यासाठी, हाच प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांना पडलाय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI