AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वा रे पठ्ठ्या.. चालत्या विमानात उघडलं इमर्जन्सी डोअर आणि विमानाच्या पंखावर मारला फेरफटका, झाला गजाआड

विमानाच्या पंखांवरुन चालणाऱी या व्यक्तीचं नाव आहे रँडी फ्रँक डेव्हिला. रँडीचं वय पंचविशीचं नाही तर ५७ वर्षांचं आहे. कॅलिफोर्नियावरुन हे रँडी महाशय शिकागोला आले होते. आणि त्यांनी कुणालाही काही कळायच्या आत हा अचाट पराक्रम केला. त्यानंतर शिकागो पोलिसांनी लागलीच त्याला गैरवर्तनाच्या आरोपाखाली अटक केली आहे. आता त्याला २७ जूनला कोर्टात हजर राहावे लागेल, अशी माहिती पोलिासंनी दिली आहे.

वा रे पठ्ठ्या.. चालत्या विमानात उघडलं इमर्जन्सी डोअर आणि विमानाच्या पंखावर मारला फेरफटका, झाला गजाआड
Chicago Airport crimeImage Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: May 06, 2022 | 7:39 PM
Share

शिकागो एकापेक्षा एक भन्नाट माणसं या जगात आहेत, त्यांच्या विस्मयकारक कृत्याचं अनेकांना कोडं पडतं, अनेकदा ते चर्चेचा किंवा कुतुहलाचाही विषय ठरतात, पण शिकागो (Chicago O’Hare International Airport)विमानतळावर घडलेल्या या प्रकारानं तुम्ही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही हे नक्की. चालत्या विमानाचा आपत्कालीन दरवाजा (opened emergency exit ) उघडून, एक प्रवासी चक्क विमानाच्या बाहेर आला आणि त्याने विमानाच्या पंखावर वॉक घेतला. ( wing of the plane)सन डिएंगोवरुन शिकागोला येत असलेल्या विमानात हा प्रकार घडला. शिकागो विमानतळावर विमान उतरल्यानंतर, चालत्या विमानात या प्रवाशाने इमर्जन्सी डोअर ओपन केले आणि कुणालाही कळायच्या आत तो विमानांच्या पंखांवरुन फेरफटका मारुन आला. या प्रकारानंतर तातडीनं या प्रवाशाला पोलिसांनी अटक केली आहे.

कसा घडला हा प्रकार

सन डिएगोवरुन युनायडेट एयरलाईन्सचं विमान २४७८ शिकागो विमानतळावर उतरत असताना हा प्रकार घडला. विमान धावपट्टीवर असताना एका प्रवाशानं विमानाचं इमर्जन्सी डोअर ओपन केलं आणि तो प्रवासी विमानाच्या पंखावर दाखल झाला. विमानात असलेल्या प्रवाशांच्या, कर्मचाऱ्यांच्या लक्षात यायच्या आधीच हा प्रवासी पंखावर पोहचलाही. त्याने या पंखावरुन फेरफटका मारला. ग्राऊंड क्रू मेंबर्सनी त्याला मग तिथेच थांबवले. त्यानंतर विमान थांबल्यानंतर विमानातील प्रवाशांना सुखरुप खाली उतरवण्यात आले आणि नंतर या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली.

५७ वर्षांच्या व्यक्तीचं अचाट साहस

विमानाच्या पंखांवरुन चालणाऱी या व्यक्तीचं नाव आहे रँडी फ्रँक डेव्हिला. रँडीचं वय पंचविशीचं नाही तर ५७ वर्षांचं आहे. कॅलिफोर्नियावरुन हे रँडी महाशय शिकागोला आले होते. आणि त्यांनी कुणालाही काही कळायच्या आत हा अचाट पराक्रम केला. त्यानंतर शिकागो पोलिसांनी लागलीच त्याला गैरवर्तनाच्या आरोपाखाली अटक केली आहे. आता त्याला २७ जूनला कोर्टात हजर राहावे लागेल, अशी माहिती पोलिासंनी दिली आहे.

विमानतळांवर गैरप्रकार करणाऱ्यांच्या संख्येत वाढ

विमानात प्रवाशांकडून असे प्रकार सर्रास होताना आणि त्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे. काही जण तर विमान प्रवास सुरु असताना हवेत दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतायेत. फेब्रुवारीत अमेरिकन एयरलाईन्सच्या विमनात असा प्रकार घडला होता. जो प्रवासी हवेत दरवाजा उघडण्याच्या प्रयत्नात होता, त्याला अखेरीस फ्लाईट एटेंटन्टच्या हातीतील कॉफी मगने मार खाण्याची वेळ आली होती. एप्रिलमध्ये एका महिला प्रवाशाने हवेत विमानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या एका प्रवाशाला मारहाण केली म्हणून तिला 77272 डॉलर्स दंड आकारण्यात आला होता. तर दुसऱ्या एका घटनेत फ्लाईट अटेंटन्टला मारहाण, केबिन डोअर उघडण्याचा प्रयत्न, क्रू मेंबर्स आणि सह प्रवाशांना मारहाण करणाऱ्या एका व्यक्तीला सर्वाधिक 81950 डॉलर्सचा दंड आकारण्यात आला होता.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.