मतदानाच्या आधी वडिलांचे निधन, अस्थी घेऊन 7 मुलं मतदानाला

मतदानाच्या टक्केवारी सातत्याने घट होताना पाहायला मिळत आहे. मात्र बदलापूरमधील वडवली गावातील म्हात्रे कुटुंब याला अपवाद ठरलं (Mhatre Family vote) आहे.

मतदानाच्या आधी वडिलांचे निधन, अस्थी घेऊन 7 मुलं मतदानाला
Follow us
| Updated on: Oct 21, 2019 | 4:28 PM

बदलापूर : ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ असे सरकारतर्फे वारंवार (Maharashtra Voting) सांगितले जाते. गेल्या काही वर्षांपासून अनेकजण मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून एन्जॉय करतात. यामुळे मतदानाच्या टक्केवारी सातत्याने घट होताना पाहायला मिळत आहे. मात्र बदलापूरमधील वडवली गावातील म्हात्रे कुटुंब याला अपवाद ठरलं (Mhatre Family vote) आहे.

म्हात्रे कुटुंबातील एका कुटुंबातील निधन झाले असतानाही त्यांनी मतदानाचा पवित्र अधिकार बजावला आहे. म्हात्रे कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य पांगळू झिपरु म्हात्रे यांचे काल (20 ऑक्टोबर) हृदयविकाराच्या धक्क्याने निधन (Maharashtra Voting) झाले. त्यामुळे संपूर्ण म्हात्रे कुटुंबावर शोककळा पसरली. रात्री उशिराने पांगळू म्हात्रे यांच्या सात मुलांनी त्यांना अग्नी दिला.

त्यानंतर आज सकाळी वडिलांच्या अस्थी गोळा करण्याच्या विधी उरकला. मात्र त्यानंतर घर न गाठता त्यांनी थेट मतदान केंद्र गाठले. त्यानंतर त्यांच्या मुलांनी मतदानाचा हक्क बजावला.

दरम्यान कुटुंबातील एखाद्या सदस्याचे निधन झाल्यावर 13 दिवस दुखवटा पाळला जातो. या काळात कुठेही जाता येत नाही. मात्र म्हात्रे कुटुंबातील 52 सदस्यांनी दुखवटा बाजूला सारुन मतदान (Mhatre Family vote) केले.

मतदान करणे हा आपला अमूल्य हक्क आहे आणि तो आपण सर्वांनी बजावला पाहिजे असे आवाहनही म्हात्रे कुटुंबाने केले. या कुटुंबाच्या कृतीतून त्यांनी सर्वांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.