इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे सिनेमा पहाटे 4 वाजता रिलीज होणार

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ‘ठाकरे’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. येत्या शुक्रवारी 25 जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा तसा अनेक कारणांसांठी चर्चेचा विषय ठरतो आहे. त्यातच आता या सिनेमाबाबत आणखी एक विशेष बाब समोर आली आहे. हा सिनेमा प्रदर्शनाच्या दिवशी निश्चित वेळेच्याआधी प्रदर्शित केला जाणार आहे. […]

इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे सिनेमा पहाटे 4 वाजता रिलीज होणार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ‘ठाकरे’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. येत्या शुक्रवारी 25 जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा तसा अनेक कारणांसांठी चर्चेचा विषय ठरतो आहे. त्यातच आता या सिनेमाबाबत आणखी एक विशेष बाब समोर आली आहे. हा सिनेमा प्रदर्शनाच्या दिवशी निश्चित वेळेच्याआधी प्रदर्शित केला जाणार आहे. रिपोर्ट्सनुसार, पहिल्यांदाच कुठल्या सिनेमाच्या प्रदर्शनाचा पहिला शो हा निश्चित वेळेच्याआधी प्रदर्शित केला जातो आहे.

‘ठाकरे’ सिनेमाचा पहिला शो हा वडाळ्याच्या आयमॅक्समध्ये पहाटे 4.45 वाजताचा ठेवण्यात आला आहे. ‘बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत लोकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न आहेत. बाळासाहेबांची सुरुवात कशी झाली, हे बघण्यासाठी लोक खूप उत्सूक आहेत. लोकांना त्यांच्याबाबत जाणून घ्यायचे आहे. म्हणून या सिनेमाची महाराष्ट्रात खूप मागणी आहे’, असे आयमॅक्सच्या चालकांनी स्पॉटबॉयला सांगितले.

साधारणपणे कुठल्याही सिनेमाचा पहिला शो हा सकाळी सात वाजता प्रदर्शित केला जातो. पण एखाद्या सिनेमाला पहाटे 4.45 ला प्रदर्शित करणे हे पहिल्यांदाच होत आहे.

‘ठाकरे’ हा सिनेमा बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत आहे. या सिनेमात अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी यांनी बाळासाहेबांची भूमिका पडद्यावर साकारली आहे, तर अभिनेत्री अमृता राव हिने माँसाहेबांची भूमिका साकारली आहे. ‘ठाकरे’ सिनेमाची निर्मिती शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी केली आहे. तसेच, मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

बाळासाहेबांचा शिवसेना स्थापन करण्याआधीचा काळा आणि शिवसेना स्थापन केल्यानंतरचा काळ, असा या सिनेमात दाखवण्यात आला आहे. हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला देशभरात 1200 ते 1300 स्क्रीनवर प्रदर्शित होत आहे. विदेशातही 400 ते 500 स्क्रीनवर हा सिनेमा प्रदर्शित होईल.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.