शासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक

विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देते असे सांगून वयोवृद्ध महिलांना लुटणाऱ्या एका महिलेला तुमसर पोलिसांनी अटक (women arrested in government schemes) केली आहे.

शासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक

भंडारा : विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देते असे सांगून वयोवृद्ध महिलांना लुटणाऱ्या एका महिलेला तुमसर पोलिसांनी अटक (women arrested in fraud government schemes) केली आहे. या महिलेने आतापर्यंत तुमसरमध्ये चार वेगवेगळ्या ठिकाणी वृद्ध महिलेला लुटल्याची कबूली दिली (women arrested in fraud government schemes) आहे. या महिलेने इतर लोकांना फसवले आहे का, तिचा कुठल्या टोळीशी संबंध आहे का याचा शोध सध्या तुमसर पोलीस घेत (women arrested in fraud government schemes) आहेत.

गेल्या तीन महिन्यांपासून तुमसरमध्ये वयोवृद्ध महिलांची योजनांच्या नावाने फसवणूक करण्याच्या घटनेत वाढ झाली होती. यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. यानुसार विविध सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आणि गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी निशिगंधा उर्फ ज्योती गोपीचंद रामटेके या महिलेला अटक केली आहे. निशिगंधा या गोंदिया जिल्ह्यातील कुटीपार गावातील घरातून अटक केली आहे.

सुलोचना घोडीचोर या 60 वर्षीय महिलेला आरोपी महिलेने फसवले. सुलोचना या एका सार्वजनिक कार्यक्रमात नाश्ता खात असताना आरोपीने तिला श्रावण बाळ योजनेचे तुला लाभ मिळतो का? असे विचारले. आरोपी महिलेने मी तुला एक लाख 80 हजार रुपये मिळवून देतो असे सांगितले. त्यासाठी तुमचे फोटो लागतील, तसेच यासाठी काही खर्चही होईल असेही त्या आरोपी महिलेने सुलोचना यांना सांगितले.

यानंतर सुलोचना यांनी आरोपी महिलेला 14 हजार रुपये आणि तीन ग्रॅम सोन्याची चैन दिली. तुमचा फॉर्म घेऊन येतो असे सांगून ती आरोपी महिला तिथून निघून गेली. मात्र आरोपी महिला परत न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे सुलोचना यांना लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ तुमसर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार (women arrested in fraud government schemes) नोंदवली.

याशिवाय आरोपी महिला निशिगंधा हिने एका वृद्ध महिलेला पतीच्या मृत्यूचे 40 हजार रुपये आणि तुला 20 हजार रुपये मिळवून देतो असे सांगत फसवणूक केली. त्यासाठी 7 हजार रुपये खर्च येईल असे सांगून तिच्याकडून दागिने घेतले. तर एका विधवा म्हाताऱ्या स्त्रीचे पैसे मिळवून देतो असे सांगून तिच्याकडील दागिने लुटले.

इतकचं नव्हे तर एका महिलेला शासनाकडून बांधकाम साहित्याची पेटी मिळाली आहे. त्यातील 8 हजार रुपये मिळवून देतो असे सांगून तिचीसुद्धा आरोपी महिलेने (women arrested in fraud government schemes) फसवणूक केली.

दरम्यान वृद्ध महिलांना लुबाडणाऱ्या या महिलेविरुद्ध 550/19 कलम 420 भादविनुसार गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. अशा पद्धतीची फसवणूक जिल्ह्यातील विविध तालुक्यात या अगोदरही झाली आहे. या सर्व घटनांमध्ये या महिलेचे काही संबंध आहेत का? किंवा हिचा कोणत्याही टोळीशी संबंध आहे का? याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI