केवळ चार हजार रुपयांसाठी मित्राची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला, दोघांना अटक

चार हजार रुपयांच्या देवाण-घेवाणीवरुन या मित्रांमध्ये वाद झाला. त्यानंतर तीन मित्रांनी एका हर्ष नावाच्या तरुणाची हत्या केली.

केवळ चार हजार रुपयांसाठी मित्राची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला, दोघांना अटक

लखनौ : उत्तर प्रदेशात केवळ 4 हजार रुपयांसाठी एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची (Friends Murder Friend) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील हापुड जिल्ह्यात ही घटना घडली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांना या तरुणाच्या हत्येचा छडा लावण्यात यश आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे. तर एक जण अद्याप फरार आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहेत (Friends Murder Friend).

चार हजार रुपयांच्या देवाण-घेवाणीवरुन या मित्रांमध्ये वाद झाला. त्यानंतर तीन मित्रांनी एका हर्ष नावाच्या तरुणाची हत्या केली. त्यानंतर मृतदेह नाल्यात फेकून दिला.

या प्रकरणात पोलिसांनी हिमांशू आणि हर्षला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत हर्षचा मोबाईल या दोन आरोपींनी मोहित गीरी नावाच्या मित्राकडे दिला. हर्षने त्याचा फोन मागितला तेव्हा या मित्रांनी त्याच्याकडे चार हजार रुपयांची मागणी केली. त्यावरुन या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर हा वाद इतका टोकाला गेला की यांच्यामध्ये मारहाण झाली.

मित्रांनी हर्षच्या गळ्यात बेल्टचा फास बनवून त्याची हत्या केली. यानंतर तीनही आरोपींनी मृतदेह लपवण्यासाठी नाल्यात फेकला. सध्या पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून पुढील तपास करत आहे. या आरोपींपैकी एक आरोपी अल्पवयीन आहे. तिसरा आरोपीही लवकरात लवकर अटकेत असेल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.

आठवड्याभरापूर्वी पिलखुआ येथे एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तात्काळ दोघांना अटक करण्यात आली होती. तर तिसऱ्या आरोपीलाही लवकरच अटक करण्यात येईल. अटकेत असलेल्या दोघांनी हत्येची कबुली दिली आहे, अशी माहिती हापुडच्या एसपींनी दिली.

Friends Murder Friend

संबंधित बातम्या :

घरातून गायब झालेल्या तिघांचे मृतदेह झाडाला लटकलेले आढळले, आत्महत्येची शक्यता; शहापूर हादरले

सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीच्या हत्येचं गूढ उकललं, काच खाली न केल्याच्या रागातून हत्याकांड

शेजारी राहणाऱ्या तरुणाकडून वारंवार छेडछाड; वैतागलेल्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI