शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी : शेतीमालावर मिळतेय 75 टक्के कर्ज

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्यावतीने शेतमाल तारण योजना गेल्या काही दिवसांपासून सुरु करण्यात आली आहे. उतरत्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये शिवाय शेतीमाल साठवणूकीचाही प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावू नये या अनुशंगाने शेतीमाल तारण कर्ज योजना राबवली जात आहे. याच योजनेचे काय फायदे आहेत ?

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी : शेतीमालावर मिळतेय 75 टक्के कर्ज
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 06, 2021 | 9:43 AM

मुंबई : शेतकऱ्यांचे हीत समोर ठेऊन शासनाच्यावतीने अनेक योजना राबवल्या जात आहेत. मात्र, जनजागृतीचा आभाव आणि शेतकऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे त्याचा लाभ मिळत नाही. महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्यावतीने शेतमाल तारण योजना गेल्या काही दिवसांपासून सुरु करण्यात आली आहे. उतरत्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये शिवाय शेतीमाल साठवणूकीचाही प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावू नये या अनुशंगाने शेतीमाल तारण कर्ज योजना राबवली जात आहे. याच योजनेचे काय फायदे आहेत ?

यामध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे याची माहिती आज आपण घेणार आहोत. शेती उत्पादनापेक्षा त्या मालाला काय भाव आहे हे शेतकऱ्यांसाठी महत्वाचे आहे. बाजार भावातील चढ-उताराचा फटका कायम शेतकऱ्यांना बसलेला आहे. हे आर्थिक नुकसान टाळून त्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्यातील बाजार समित्यांचे माध्यमातून शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे.

शेतकऱ्यास सुगीच्या कालावधीत असलेली आर्थिक निकड विचारात घेऊन, त्यांना गरजेच्या वेळी सुलभ व त्वरित कर्ज उपलब्ध करून देणे हा शेतमालतारण कर्ज योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बाजार समिती अथवा वखार महामंडळाच्या गोदामात ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किंमतीच्या 75 टक्के पर्यंत रक्कम सहा महिने कालावधीसाठी सहा टक्के व्याज दराने तारण कर्ज म्हणून देण्यात येते.

कोणत्या शेतीमालाचा समावेश आहे ?

योजनेच्या सुरवातीला काही मोजक्याच पिकांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, आता शेतमाल तारण कर्ज योजनेमध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, चना, भात, करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, काजू बी, बेदाणा, हळद या शेतमालाचा समावेश आहे. राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत आहे.

कृषि पणन मंडळाच्यावतीने जनजागृतीचे अवाहन

शेतीमाल तारण कर्ज योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा या दृष्टीने जनजागृती करण्याचे अवाहन कृषि पणन मंडळाच्यावतीने करण्यात आले होते. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना तारण कर्ज अदा करावे यासाठी सन 2016-17 मध्ये, बाजार समित्यांना प्रोत्साहन म्हणून बक्षीस योजना सुरू केली आहे. त्यामुळेच आता उतरते बाजारभाव असल्यास शेतकरी शेतीमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घेत आहेत.

शेतमालाचे प्रकारानुसार कर्जवाटप व व्याजदर

1.शेतमाल प्रकार : सुर्यफूल, सोयाबीन, तुर, उडिद, भात , करडई, मुग, हळद, चना या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या 75 टक्के रक्कम ही कर्ज म्हणून शेतकऱ्यांना दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता 6 टक्के व्याजदर आहे.

2. शेतमाल प्रकार : मका,ज्वारी, गहू, बाजरी या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या 50 टक्के रक्कम ही कर्ज म्हणून शेतकऱ्यांना दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता 6 टक्के व्याजदर आहे.

3. शेतमाल प्रकार : काजू बी या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या 75 टक्के रक्कम ही कर्ज म्हणून शेतकऱ्यांना दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता 6 टक्के व्याजदर आहे.

4. शेतमाल प्रकार : बेदाणा या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या 50 टक्के रक्कम ही कर्ज म्हणून दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता 6 टक्के व्याजदर आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठीच्या अटी- नियम

या योजनेचा लाभ केवळ शेतकऱ्यांनाच घेता येणार नाही. शेतकऱ्यांचाच शेती माल तारण म्हणून ठेवता येणार आहे.

शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत व्यापाऱ्यांचा माल स्विकारला जात नाही.

शेतकऱ्याने बाजार समितीकडे तारण ठेवलेल्या शेतमालाची साठवणुक, देखरेख व सुरक्षा जबाबदारी संबंधित बाजार समितीची असणार आहे. ती विनामुल्य आहे. त्यासाठी शेतकऱ्याला अतिरिक्त रक्कम अदा करायची गरज नसणार आहे.

शेतकऱ्याने तारण ठेवलेल्या शेतमालाची किंमत ही त्यादिवसाचे चालू बाजारभाव किंवा शासनाने जाहीर केलेली खरेदी किंमत यापैकी जी कमी असेल, ती ठरविण्यात येते.

कर्जासाठी तारण ठेवलेल्या शेतमालाचा विमा उतरविण्याची जबाबदारी हि त्या संबंधीत बाजार समितीची असणार आहे.  (Golden opportunity for farmers; 75% of the loan is now available on agricultural produce, )

संबंधित बातम्या :

खरीपातील कांद्याचे किड व्यवस्थापन गरजेचे, अन्यथा ‘कांद्याचा होईल वांदा’

कोबीची शेती : कमी कालावधीत अधिकचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांसमोर उत्तम पर्याय

लातूर बाजारभाव : सोयाबीनची काढणी होताच आवक वाढली, दर मात्र ‘जैंसे थे’

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.