स्पर्म डोनरपासून जुळं, 5 वर्षांनी नवऱ्याने सोडलं, मग डोनरही मुलांना घेऊन पसार

जुळी मुलं माझी नाहीत, यावरुन पतीने महिलेशी वादावादी सुरु केल्यामुळे महिला विभक्त झाली आणि तिची स्पर्म डोनरशी पुन्हा भेट झाली

स्पर्म डोनरपासून जुळं, 5 वर्षांनी नवऱ्याने सोडलं, मग डोनरही मुलांना घेऊन पसार

अहमदाबाद : मद्यपी पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने स्पर्म डोनरसोबत नवा संसार थाटण्याची स्वप्न पाहिली. मात्र या तरुणाने महिलेचा लग्नाचा प्रस्ताव धुडकावून ‘स्वतःच्या’ मुलांसोबत पळ काढला. गुजरातमधील अहमदाबादमध्ये ही अजब कहाणी घडल्याची माहिती आहे. (Gujarat Woman falls in love with sperm donor, man abandons her after taking away own sons)

45 वर्षीय शीला (नाव बदलले आहे) यांच्या दुर्दैवी नशिबाची गोष्ट ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने समोर आणली आहे. शीला यांचे लग्न काही वर्षांपूर्वी वस्त्रालमधील एका व्यक्तीशी झाले होते. चार वर्षांनीही संसारवेलीवर फूल न उमलल्याने त्यांनी आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे अपत्यप्राप्तीचा मार्ग अवलंबला. या काळात ओळख झालेल्या एका तरुणाने स्पर्म डोनेट करण्याची तयारी दाखवली. ही प्रक्रिया यशस्वी झाली आणि महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला.

पुढील पाच वर्षांच्या काळात दाम्पत्याच्या संसारात कोणताही व्यत्यय नव्हता. मात्र अचानक पतीला मद्यपानाची सवय जडली आणि तो दारुच्या आहारी गेला. जुळी मुलं माझी नाहीत, यावरुन पतीने महिलेशी वादावादी सुरु केली. परंतु, आयव्हीएफ तंत्रज्ञानाची कल्पना तूच मांडली होतीस आणि माझा स्पर्म डोनरशी कोणताही संबंध नाही, हे महिलेने त्याला वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद वाढल्याने ती अखेर पतीपासून वेगळी राहू लागली.

शीला घरकाम करुन दोन मुलांचा उदरनिर्वाह करु लागली. दरम्यानच्या काळात तिची अपत्यप्राप्तीसाठी मदत केलेल्या त्याच स्पर्म डोनरशी गाठभेट झाली. तो अहमदाबादमध्येच कोचिंग सेंटर चालवत होता. त्यालाही शीलाच्या परिस्थितीची जाणीव असल्याची माहिती आहे.

शीला आणि संबंधित स्पर्म डोनर यांची हळूहळू मैत्री झाली. त्याने शीलाला मुलांचा सांभाळ करण्यास मदत केली. पाच महिन्यांपूर्वी ती त्याच्यापासून गरोदर राहिली. त्यामुळे शीलाने त्याच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला, मात्र त्याने तो धुडकावल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे दोन्ही मुलं ‘माझी’ आहेत, असं शीलाला सांगून तो दोन्ही मुलांना घेऊन वेगळा राहू लागला आणि शीलाला मुलांची भेट घेण्यासही त्याने मज्जाव केला. त्यामुळे शीलाची अवस्था आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी झाली आहे.

संबंधित बातम्या 

बॉयफ्रेण्डने विचारले ही मुलगी कुणाची, आईकडून रागात एक महिन्याच्या मुलीची हत्या

बॉयफ्रेण्डसोबत रंगेहाथ पकडल्याने कोल्हापुरात सूनेने सासूचा काटा काढला

(Gujarat Woman falls in love with sperm donor, man abandons her after taking away own sons)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI