‘गुपकार गँग’ला काश्मीरमध्ये परदेशी शक्तींचा हस्तक्षेप हवाय; सोनिया-राहुल गांधींना हे मान्य आहे का?: अमित शहा

भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधील 'गुपकार ग्रुप'ची 'गुपकार गँग' अशी संभावना केली आहे. (Gupkar Gang Going Global: Amit Shah)

'गुपकार गँग'ला काश्मीरमध्ये परदेशी शक्तींचा हस्तक्षेप हवाय; सोनिया-राहुल गांधींना हे मान्य आहे का?: अमित शहा

नवी दिल्ली: भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधील ‘गुपकार ग्रुप’ची ‘गुपकार गँग’ अशी संभावना केली आहे. ”या गुपकार गँगला जम्मू-काश्मीरमध्ये परदेशी शक्तींचा हस्तक्षेप हवा आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं या गुपकार गँगला समर्थन आहे का?”, असा सवाल अमित शहा यांनी केला आहे. (Gupkar Gang Going Global: Amit Shah)

अमित शहा यांनी लागोपाठ तीन ट्विट करून हा सवाल केला आहे. यावेळी त्यांनी गुपकार ग्रुपला देशाच्या मूडसोबत चालण्याचं आवाहन केलं आहे. देशाच्या मूडसोबत वाटचाल केली नाही तर तुमचा नायनाट केला जाईल, असा इशाराही शहा यांनी दिला आहे.

गुपकार गँग आता ग्लोबल होत आहे. परदेशी शक्तींनी जम्मू-काश्मीर प्रश्नात हस्तक्षेप करावा, असं त्यांना वाटतंय. गुपकार गँगला भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंग्याचा अपमान करायचा आहे. गुपकार गँगच्या या भूमिकेचं सोनिया गांधी आणि राहुल गांधी स्वागत करत आहेत का? गुपकार गँगच्या या भूमिकेवर सोनिया गांधी आणि राहुल यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

काँग्रेस आणि गुपकार गँग जम्मू-काश्मीरला दहशत आणि अशांततेच्या काळात ढकलू पाहत आहेत. आम्ही अनुच्छेद 370 हटवून दलित, महिला आणि आदिवासींना दिलेले अधिकार या लोकांना हिरावून घ्यायचे आहेत, असा दावा करतानाच म्हणूनच या लोकांना देशातील प्रत्येक राज्यात पराभवाचा सामना करावा लागत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि नेहमीच राहील. भारत आपल्या राष्ट्रीय हितासाठी कोणत्याही अपवित्र ग्लोबल आघाडीला स्वीकारणार नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.

 

संबंधित बातम्या:

दिल्लीत मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; ‘जैश’च्या दोन दहशतवाद्यांना अटक

राहुल गांधी सीरिअस राजकारणी नाहीत, ते पिकनिकला जातात, राजदला ठाऊक नव्हतं? : देवेंद्र फडणवीस

काश्मीर हा भारत-पाकचा मुद्दा, मग आता एकट्या भारताचा कसा? काँग्रेसचा सवाल, अमित शहांनी धुतलं

(Gupkar Gang Going Global: Amit Shah)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI