Food | थंडीच्या दिवसांत लाभदायक ‘फॅटी’ फूड, वजन नियंत्रणासोबत रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील!

बर्‍याच पौष्टिक पदार्थांमध्ये देखील चरबीचे प्रमाण जास्त असते. यातील काही चरबीयुक्त पदार्थ आपले वजन कमी करण्यात मदत करतात.

Food | थंडीच्या दिवसांत लाभदायक ‘फॅटी’ फूड, वजन नियंत्रणासोबत रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील!
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 12:26 PM

मुंबई : स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण निरोगी आहारासह जिममध्ये जाऊन खूप घाम देखील गाळतो. रिफाइंड कार्बन, प्रक्रिया केलेले अन्न आणि साखर युक्त खाद्य पदार्थ आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. आहारात या गोष्टींचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने मधुमेह, हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात. परंतु, ‘फॅट’ म्हणजेच चरबी युक्त पदार्थांचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी नेहमीच हानिकारक ठरेल, असे नाही (Healthy Fatty Food during Winter).

बर्‍याच पौष्टिक पदार्थांमध्ये देखील चरबीचे प्रमाण जास्त असते. यातील काही चरबीयुक्त पदार्थ आपले वजन कमी करण्यात मदत करतात. या व्यतिरिक्त या पदार्थांमध्ये बरीच पौष्टिक तत्त्वे उपस्थित असतात.

  1. अ‍ॅवाकाडो

अ‍ॅवाकाडोमध्ये भरपूर प्रमाणात मोनो सॅच्युरेटेड फॅट, फायबर आणि पोटॅशियम असते. जे आपल्या शरीरातील एचडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवते आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. म्हणूनच अ‍ॅवाकाडोला ‘सुपर फूड’ असे देखील म्हणतात. अ‍ॅवाकाडो सॅलड आणि इतर पाककृतींमध्ये वापरले जाते.

  1. चीज

चीज मध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. त्यात कॅल्शियम, व्हिटामिन बी-12, फॉस्फरस, सॅलिनियम आणि प्रथिने यासारखे पोषक घटक असतात. चीज हे पोषक दुग्ध उत्पादन आहे जे टाईप-2 मधुमेहाचा धोका कमी करते.

  1. डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेट फक्त खाण्यापुरतेच मर्यादित नाही. त्याव्यतिरिक्त डार्क चॉकलेटमध्ये भरपूर फायबर, हेल्थी फॅट, लोह, मॅग्नेशियम, अँटिऑक्सिडेंट्स आहेत. जे आपले रक्तदाब कमी करतात आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल देखील कमी करतात (Healthy Fatty Food during Winter).

  1. अंडे

अंड्यातील पिवळा बलक आपल्या कोलेस्ट्रॉलसाठी फायदेशीर नसतो. पण एका संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, अंड्यातील पिवळ बलक आपल्या कोलेस्ट्रॉलवर परिणाम करत नाही. तथापि, अंड्यात जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि अँटिऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. अंडी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.

  1. फॅटी फिश

फॅटी फिशला ‘सुपर फूड’ देखील म्हणतात. या प्रकारच्या माशांमध्ये ओमेगा-3 आणि प्रथिनांचे प्रमाण अधिक आहे. जे आपल्या हृदयासाठी फायदेशीर ठरते.

  1. फुल फॅट दही

कमी चरबीयुक्त म्हणजेच लो फॅट दही आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असते, असे म्हटले जाते. परंतु, त्यात साखर असते. म्हणून, आपण आपल्या आहारात चरबीयुक्त दही म्हणजेच फुल फॅट दही सेवन केले  पाहिजे. दही आपल्या पाचन तंत्रास बळकट करते. याशिवाय हे आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. दही सेवन केल्याने हृदय व लठ्ठपणाचा धोका कमी होतो.

(Healthy Fatty Food during Winter)

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.