‘Housefull 4’ Trailer : हाऊसफुल 4 चा ट्रेलर रिलीज, अक्षय, रितेश आणि बॉबीची तुफान कॉमेडी

अभिनेता अक्षय कुमारच्या हाऊसफुल 4 चित्रपटाचा ट्रेलर (Housefull 4 trailer) प्रदर्शित झाला आहे. 2010 मध्ये हाऊसफुल चित्रपट प्रदर्शित (Housefull 4 trailer) झाला होता.

‘Housefull 4’ Trailer : हाऊसफुल 4 चा ट्रेलर रिलीज, अक्षय, रितेश आणि बॉबीची तुफान कॉमेडी

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारच्या हाऊसफुल 4 चित्रपटाचा ट्रेलर (Housefull 4 trailer) प्रदर्शित झाला आहे. 2010 मध्ये हाऊसफुल चित्रपट प्रदर्शित (Housefull 4 trailer) झाला होता. यानंतर आता चित्रपटाचा चौथा भागाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख, बॉबी देओल, राणा दग्गुबती, कृती खरबंदा, कृती सेनन आणि पुजा हेगडे आहे. तसेच चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीही विशेष भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद समजी यांनी केलं आहे.

हाऊसफुल चित्रपटाच्या प्रत्येक भागात एक वेगळी कथा दाखवण्यात आली. हाऊसफुल 4 चित्रपटात पुनर्जन्मची कथा मांडण्यात आली आहे. हाऊसफुल या चित्रपटाच्या सीरिजमध्ये भन्नाट कॉमेडी दाखवण्यात आली आहेत. त्यामुळे हाऊसफुल चित्रपट हा कॉमेडी चित्रपटाच्या रांगेतील (Comedy Movie) म्हणून ओळखला जातो. यंदाच्या भागातही चित्रपटात कॉमेडीचा तडखा पाहायला मिळणार आहे.

अक्षय कुमारच्या या नव्या चित्रपटातील ट्रेलरमध्ये तुफान कॉमेडी, मजा, मस्ती दाखवली आहे. अक्षय कुमार लंडनमध्ये राहणारा व्यक्ती आहे. जो 600 वर्षापूर्वी एक राजकुमार होता. त्याला त्याच्या मागच्या जन्माबद्दल अचानक सगळं आठवते. यानंतर तो आपल्या मित्रांसोबत त्याच्या पुनर्जन्माच्या गोष्टींचा शोध घेऊन आपले प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करतो.

हाऊसफुल 4 च्या ट्रेलरमध्ये खूप सारे जोक्स तसेच अक्षय आणि रितेश छान कॉमेडी करताना दिसत आहेत. याशिवाय चित्रपटात कृती खरबंदा, कृती सेनन आणि पुजा हेगडे यांनीही अप्रतिम काम केलं आहे.

चित्रपटात राणा दग्गुबती एक खतरनाक पैलवानाच्या भूमिकेत दिसत आहे. तर नवाजुद्दीन सिद्धिकी एका बाबाच्या भूमिकेत दिसत आहे. तसेच नवाजही या चित्रपटात कॉमेडी करताना दिसत आहे. त्याची सुप्रसिद्ध वेबसीरीज सेक्रेड गेम्समधील प्रसिद्ध डॉयलॉग ‘अपुन को लगता है अपुन इच भगवान है’ ऐकून तुम्हाला हसायला येईल. यासोबतच चित्रपटात चंकी पांडे, जॉनी लीव्हर आणि रणजीत यांनीही अप्रतिम अभिनय केला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI