30 नोव्हेंबरपर्यंत भारताकडे कोरोना लसीचे सर्वाधिक डोस, आतापर्यंत 1.6 अब्ज डोसचा करार!

सागर जोशी

Updated on: Dec 04, 2020 | 3:53 PM

भारतानं कोरोना लस निर्मिती करणाऱ्या 3 कंपन्यांसोबत करार केला आहे. त्यात ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेका (AstraZeneca), अमेरिकन कंपनी नोवावॅक्स इंक (Novavax Inc) आणि रशियाची कंपनी गामालेया रिसर्च इंन्स्टिट्यूटचा समावेश आहे.

30 नोव्हेंबरपर्यंत भारताकडे कोरोना लसीचे सर्वाधिक डोस, आतापर्यंत 1.6 अब्ज डोसचा करार!

नवी दिल्ली: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि जगाला घातलेला विळखा या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी लस निर्मितीचा दावा केला आहे. भारतासह अनेक देशांमधील कोरोना लस (corona vaccine) निर्मितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून पुढील वर्षाच्या सुरुवातीला लसीकरणाची सुरुवात होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच भारतानं 30 नोव्हेंबरपर्यंत कोरोना लसीचे सर्वाधिक डोस मिळवले आहेत. भारतानं आतापर्यंत 1.6 अब्ज डोसचा करार केला आहे. (India ranked first in the world in terms of corona vaccine deal)

ड्यूक विद्यापीठाच्या (Duke University) ग्लोबल हेल्थ इनोव्हेशन सेंटरने (global health innovation center)दिलेल्या आकडेवारीनुसार भारतानं कोरोना लसीच्या 1.6 अब्ज डोसचा करार हा जगभरातील कोणत्याही देशापेक्षा अधिक आहे. भारतानंतर यूरोपीय संघाचा क्रमांक लागतो. यूरोपीय संघाने आतापर्यंत 1.58 डोस करार केला आहे. तर अमेरिकन सरकारनं 1.01 कोरोना लसीचे डोस मिळवले आहेत.

जुलै-ऑगस्ट 2021 पर्यंत भारतातील जवळपास 50 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्याची केंद्र सरकारची योजना असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवारी दिली आहे. त्यानुसार भारत सरकारने लसीकरण मोहीमेची तयारीही सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे.

3 कंपन्यांसोबत भारताचा करार

ड्यूक विद्यापीठाच्या (Duke University) लॉन्च अॅन्ड स्केल स्पीडोमीरनं दिलेल्या आकडेवारीनुसार भारतानं कोरोना लस निर्मिती करणाऱ्या 3 कंपन्यांसोबत करार केला आहे. त्यात ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेका (AstraZeneca), अमेरिकन कंपनी नोवावॅक्स इंक (Novavax Inc) आणि रशियाची कंपनी गामालेया रिसर्च इंन्स्टिट्यूटचा समावेश आहे. या तिन्ही कंपन्यांना भारतानं अनुक्रमे 50 कोटी, 1 अब्ज आणि 10 कोटी डोसची ऑर्डर दिली आहे.

दुसरीकडे कॅनडा आणि ब्रिटनने 35 कोटी डोससाठी कोरोना लस निर्मिती करणाऱ्या 7 कंपन्यांसोबत करार केला आहे. तसंच ब्रिटन हा एखाद्या कोरोना लसीला मंजुरी देणारा जगातील पहिला देश बनला आहे. तर अमेरिका आणि यूरोपीय संघानं कोरोना लस निर्मिती करणाऱ्या 6 कंपन्यांसोबत करार केला आहे.

भारतात सीरम इन्स्टिट्यूट आणि एस्ट्राझेनेका या कंपन्यांची भागिदारी आहे. तर डॉ. रेड्डीज प्रयोगशाळेनं रशियाची कोरोना लस स्पुटनिक-5ची क्लीनिकल ट्रायल सुरु केली आहे. त्याच बरोबर भारतातील स्वदेशी कंपनी भारत बायोटेकने बुधवारी तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला सुरुवात केली आहे.

प्रत्येकाला 2 डोसची गरज!

कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी प्रत्येकाला दोन डोसची गरज भासणार आहे, असं मत कोरोना लसीबाबतच्या तज्ज्ञांच्या समितीचे सदस्य डॉ. व्ही. रवी यांनी सांगितलं. त्यामुळे भारताला देशातील प्रत्येकाला लसीकरण करण्यासाठी तब्बल 2.6 अब्ज डोसची गरज भासेल असं डॉ. व्ही रवी यांचं म्हणणं आहे.

भारतातील पहिली कोरोना लस दृष्टीपथात

कोरोना विषाणूवरील भारतातील पहिली वहिली लस (Corona Vaccine) दृष्टीपथात आली आहे. काही आठवड्यातच कोरोना वॅक्सिन तयार होईल. सर्वसामान्य नागरिकांचा विचार करुन लशीची किंमत निश्चित करण्यात येईल, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिली. अवघ्या काही आठवड्यात लसीकरण मोहिम सुरु करणार असल्याचेही संकेत त्यांनी दिले. देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि कोरोना लस या विषयावर आयोजित सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (4 डिसेंबर 2020) सहभागी झाले होते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार आपल्याला कोरोना लशीसाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही, असं नरेंद्र मोदी बैठकीत म्हणाले.

संबंधित बातम्या :

कोरोना लस कधी येणार? किंमत काय? सगळ्यात आधी कुणाला टोचणार? कोरोना लशीची A to Z माहिती

भारतातील पहिली कोरोना लस दृष्टीपथात, पंतप्रधानांची खुशखबर, किंमत-लसीकरण प्लॅनचीही माहिती

India ranked first in the world in terms of corona vaccine deal

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI