AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता पुढारी लोकांना वेडं करत नाही, लोकं पुढाऱ्याला वेडं करतात, गुलाबराव पाटलांची टिपण्णी

आता पुढारी लोकांना वेडं करत नाहीत, लोकंच पुढाऱ्याला वेडं करतात. दुकानंच एवढी झालीत. आता आम्हाला कार्यकर्ते सांभाळणं मुश्किल झालंय, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

आता पुढारी लोकांना वेडं करत नाही, लोकं पुढाऱ्याला वेडं करतात, गुलाबराव पाटलांची टिपण्णी
| Updated on: Feb 08, 2024 | 9:18 AM
Share

जळगाव | 8 फेब्रुवारी 2024 : आता पुढारी लोकांना वेडं करत नाहीत, लोकंच पुढाऱ्याला वेडं करतात. दुकानंच एवढी झालीत. आता आम्हाला कार्यकर्ते सांभाळणं मुश्किल झालंय, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. पक्षांची दुकानच एवढी झाली की कार्यकर्ते सांभाळणं कठीण झालं, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मिश्किल वक्तव्य केलं.

जळगावातील बिलवाडी येथे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण तसेच उद्घाटन सोहळा पार पडला. बिलवाडी गावातील रस्ते जलकुंभ स्मशानभूमीसह दहा कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील रस्त्यांसह विविध कामं बाबत गावात गावकऱ्यांकडून अनेक दिवसांपासून मागणी होती. त्याची दखल घेत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली होती. ही विकासकाम पूर्ण झाल्यानंतर गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या दहा कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी आजच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.

पक्षांची दुकानं एवढी झालीत की…

‘ ज्या नेत्यांच्या मागे कार्यकर्त्यांचा पाठिंबा असतो, तोच नेता मोठा असतो. आता पुढारी लोकांना वेडं करत नाहीत तर लोकं पुढाऱ्यांना वेडं करतात. पक्षांची दुकानंच एवढी झालीत. आम्हाला कार्यकर्ते सांभाळणंही एवढं मुश्किल झालंय. तू नाही दिलं जातो की भाजप मध्ये..भाजप मध्ये नाही दिलं, मी जातो शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये.. राष्ट्रवादीत नाही मिळालं तर मी तर जातो बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये.. असं सुरु आहे’ अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी आजच्या राजकीय परिस्थितीवर मिश्किल वक्तव्य केलं.

विरोधकांना ओपन चॅलेंज

जळगावातील बीलवाडी येथील विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषणात जोरदार फटकेबाजी केली. ‘आपल्या मतदारसंघात कोणत्याही गावात जा जर कोटीच्या खाली काम निघाले तर राजकारणातून संन्यास घेईल, विरोधकांपेक्षा कणभर काम जरी जास्त केलेला नसेल तर आमदारकीसाठी फॉर्म भरणार नाही’, या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना ओपन चॅलेंज दिलं. ‘ गरीबी मी जवळून पाहिली आहे, सोन्याचा चमचा घेवून मी जन्माला आलो नाही. मी सर्व साधारण माणूस आहे. याला जेल मध्ये टाका, याला त्रास द्या हा धंदा मी आयुष्यभर केला नाही..नुसत मत मागायच… काम करायचं नाही, बोंब पडायची नाही आणि नुसती टीका करायची’, अस म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी गुलाबराव देवकर यांच्यावर शरसंधान साधले.

माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....