महिलेने 60 वर्षीय पतीचं दुसरं लग्न लावलं, कारण आश्चर्यचकित करणारं!

सरला-लालमोहन यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती, तर दुसरीकडे चैतीचंही वय वाढत चाललं होतं. तिचं लग्न होत नसल्यामुळे दोन्ही कुटुंबाने एकत्र येत हा निर्णय घेतला

महिलेने 60 वर्षीय पतीचं दुसरं लग्न लावलं, कारण आश्चर्यचकित करणारं!
Follow us
| Updated on: Dec 20, 2019 | 12:47 PM

रांची : एकीकडे नवऱ्याशी गुलूगुलू बोलणारी मैत्रिणही काही महिलांना सहन होत नाही, मात्र झारखंडमध्ये एका महिलेने चक्क आपल्या नवरोबाचं दुसरं लग्न (Husband Second Marriage) लावून दिलं. सरला महतो यांनी 60 वर्षांच्या पतीचं लग्न 35 वर्षीय तरुणीशी लावून दिलं.

झारखंडमधील राजनगरमध्ये असलेल्या चांवरबांधा भागात हा प्रकार घडला. लालमोहन महतो आणि सरला महतो यांचं तीस वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. सरला आणि लालमोहन यांना दोन मुली आहेत. त्यांच्या मोठ्या मुलीचं लग्नही झालं आहे. मात्र मुलाच्या हव्यासातून महतो दाम्पत्याने अजब निर्णय घेतला.

सरला महतो यांनी अधिकृतरित्या ‘नवऱ्याला दुसरी बायको’ घरात आणली. 60 वर्षीय लालमोहन यांनी आपल्या मुलींच्या वयाच्या महिलेसोबत दुसरा विवाह केला. या महिलेचं नाव आहे चैती महतो.

हेही वाचा :  बलात्कार पीडितेची जाळून हत्या, चितेवर मिठी मारत आई-वडिलांचा आक्रोश

राजनगरमधील छोटा खिरीमध्ये राहणाऱ्या चैतीसोबत भीमखांदा मंदिरात दोघं विवाहबंधनात अडकले. या लग्नाला दोघांचे कुटुंबीय तर उपस्थित होतेच, पण सरलाच्या माहेरची माणसंही हजर होती.

दोन्ही कुटुंब एकमेकांच्या संमतीने जर आनंदात राहणार असतील, तर काय हरकत आहे? असं समाजसेवक रामरतन महतो म्हणतात. एकीकडे सरला-लालमोहन यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती, तर दुसरीकडे चैतीचंही वय वाढत चाललं होतं. तिचं लग्न होत नसल्यामुळे दोन्ही कुटुंबाने एकत्र येत हा निर्णय (Husband Second Marriage) घेतल्याचं म्हटलं जातं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.