बलात्कार पीडितेची जाळून हत्या, चितेवर मिठी मारत आई-वडिलांचा आक्रोश

फतेहपूरमध्ये राहणाऱ्या संबंधित तरुणीवर दोन दिवसांपूर्वी बलात्कार करण्यात आला होता, मात्र जाळल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:41 AM, 20 Dec 2019
बलात्कार पीडितेची जाळून हत्या, चितेवर मिठी मारत आई-वडिलांचा आक्रोश
प्रातिनिधीक फोटो

लखनौ : उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये बलात्कारानंतर जिवंत जाळलेल्या युवतीने रुग्णालयात अखेरचा श्वास (Fatehpur Rape Victim Death) घेतला. पीडितेचा मृतदेह घरी आणण्याऐवजी थेट स्मशानात नेण्यात आला. जेव्हा तरुणीचं पार्थिव चितेवर ठेवण्यात आलं, तेव्हा आई वडिलांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांचा बांध फुटला.

फतेहपूरमध्ये राहणाऱ्या संबंधित तरुणीवर दोन दिवसांपूर्वी बलात्कार करण्यात आला होता. बलात्कारानंतर आरोपीने तिला जिवंत जाळलं होतं. तिच्यावर कानपूरमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र गुरुवारी तिचं उपचारांदरम्यान निधन झालं.

युवतीचं पार्थिव तिच्या मूळ घरी न नेता थेट स्मशानात नेण्यात आलं. अंत्यविधींना काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांनीही हजेरी लावली. काँग्रेसने पीडितेच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची नुकसान भरपाई आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

लॉजवरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोघा तरुणांना बेड्या

मुलीला अखेरचा निरोप देताना तिच्या आई-वडिलांची रडून-रडून वाईट स्थिती झाली होती. तिचं पार्थिव चितेवर ठेवताच आई वडिलांनी तिला गच्च मिठी मारली. आपली मुलगी कायमची आपल्यापासून दुरावणार असल्याचं दुःख त्यांना सहन होत नव्हतं.

पीडितेच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती नाजूक आहे. तिचा मोठा भाऊ गावातच राहतो, तर दुसरा भाऊ सहकुटुंब दिल्लीत राहतो. पीडिता तीन भाऊ आणि आई-वडिलांसह राहत होती. लहानपणीच तिची शाळा सुटल्याने शिक्षण अर्धवट राहिलं होतं. Fatehpur Rape Victim Death