आज तुमच्यातला मुसलमान जागा झाला काय?, जितेंद्र आव्हाड यांचा मुश्रीफ यांना टोला

विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपाला कोल्हापूरात मोठा धक्का बसला आहे. समरजीत घाटगे यांनी शरद पवार गटात सहभाग घेतला आहे. यावर हसन मुश्रीफ यांनी शरद पवारांवर टिका केली आहे. त्यास आता जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले आहे.

आज तुमच्यातला मुसलमान जागा झाला काय?, जितेंद्र आव्हाड यांचा मुश्रीफ यांना टोला
Follow us
| Updated on: Sep 04, 2024 | 4:57 PM

कोल्हापूरातील कागल मतदार संघातून समरजीत घाडगे यांना तिकीट देण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे. यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेलेले हसन मुश्रीफ नाराज झाले आहेत. आपण मुस्लीम असल्याने आपल्या विरोधात शरद पवारांना राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यास जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

महाराष्ट्राला मला सांगावसं वाटतं की कागल मतदार संघात एकेकाळी शरद पवार यांच्या अत्यंत निकटवर्तीय सदाशिव मंडलिक हे निवडून येत होते. त्यानंतर विरोध असताना 98% समाज मराठा,धनगर,माळी आणि इतर समाज असताना मुस्लिम समाजाचा उमेदवार हसन मुश्रीफ यांच्या नावाने दिला आणि शरद पवार यांनी त्यांना चार-पाच वेळा निवडून आणलं, तेव्हा हे कधी बोलले नाहीत की मी शरद पवारांच्या पुण्याईने निवडून आलो म्हणून असे जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की तुम्ही आता शरद पवारांची साथ सोडली त्यामुळे शरद पवार आता तिथे उमेदवार देणारच ना ?

शरद पवारांचा त्यात मोठेपणा नव्हता? का ?

ज्या माणसाने तुम्हाला एका बहुसंख्यांक मतदार संघातून तुम्हाला निवडून आणलं, तेव्हा तुम्हाला काही वाटलं नाही?, शरद पवारांचा त्यात मोठेपणा नव्हता? ज्या पद्धतीने शरद पवारांवरती टीकाटिप्पणी होत होती, तेव्हा तुमचं बोलण्याचं धाडस झालं नाही. त्यावेळी जर तुम्ही शरद पवारांच्या बाजूने बोलला असतात तर एक वेळ तुमच्याबद्दल त्यांच्या हृदयातलं प्रेम वाढलं असतं, हे सगळं घडत असताना तुम्ही मात्र शरद पवार साहेबांना एकटं सोडून गेलात. तुम्ही विचार करा आणि महाराष्ट्र देखील विचार करेल की बहुसंख्यांक समाज तिथे असताना तुमच्यासारख्या एका मुस्लिम उमेदवाराला पवार साहेब तिकडून निवडून आणायचे तेही मोठ्या फरकाने हे तुम्ही कसं काय विसरलात ? असाही सवालही आव्हाड यांनी यावेळी केला आहे.

शरद पवारांना मानणारा मतदार कागल संघ

तुम्ही जर पवार साहेबांचा घातच केला आहे तर, ते तरी तुमचा विचार कशाला करतील ते त्यांची राजकीय खेळी खेळणारच ना ? तुम्ही अल्पसंख्यांक आहात म्हणून तुमच्या मागे लागणं.. यात काहीच अर्थ नाही. तो मतदार संघ अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांकवर नाही तो मतदारसंघ शरद पवारांना मानणारा आहे आणि शरद पवार सांगतील तो उमेदवार निवडून आणणारा आहे. तुम्हाला एवढंच जर प्रेम होतं तर परवा ट्रेनमध्ये एका म्हाताऱ्या मुसलमानाला मारण्यात आलं तेव्हा तुम्ही का नाही बोललात ? असेही जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.

देशभरात मुसलमानांना मारत आहेत, गोळ्या घालत आहेत त्यावर तुम्ही का बरं बोलत नाहीत ? तुमच्याच युतीतले आमदार मुसलमानांना मशिदीत घुसून गोळ्या घालेन, असं म्हणतात तेव्हा तुम्ही साधा निषेधाचा शब्द सुद्धा काढलेला नाही, ना तुमच्या नेतृत्वाने काढला आहे. आता अचानक तुम्हाला आठवण झाली की तुम्ही मुसलमान आहे आणि म्हणून तुम्हाला विरोध होतोय, म्हणून शरद पवार तुमच्या मागे लागलेत. शरद पवार जात-पात ,प्रांत यापुढे जाऊन राजकारण करतात. मी अशा महाराष्ट्रातील अनेक जागा दाखवील जिथे समाज एक टक्का असताना त्याला उमेदवारी देऊन निवडून आणलेले आहे, तुम्ही या त्यांच्या मोठेपणाचा विचार करायला हवा होता असेही जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.

विशाल गडावर हल्ला झाला तेव्हा तुम्ही का भूमिका घेतली नाही?, जेव्हा मस्जिद तोडण्यात आली,गजापूरमध्ये जेव्हा कुराण फाडण्यात आली, तेव्हा तुम्ही कुठे होतात ? रंग बदलू नका, तुम्ही मुस्लिम आहात हे मान्य आहे, पण शरद पवारांना यात खेचू नका, तुम्हाला पाडण्यासाठी तुम्ही जर शरद पवारांना चिमटा काढलाय तर त्याचं प्रत्युत्तर ते देणार ना? का नाही द्यायचं..त्यांना आम्ही सांगू की द्याच. काय दिलं नाही तुम्हाला शरद पवारांनी, कोल्हापूर सारख्या जिल्ह्याचा पालकमंत्री केलं,तेव्हा तुम्ही विचार नाही केला. हा नाटकीपणा आणि हे ढोंग बंद करा, तुमच्या या ढोंगीपणाला फार किंमत कोल्हापुरात मिळणार नाही आणि कागलमध्ये पण मिळणार नाही असेही आव्हाड यावेळी म्हणाले.

अनेकांनी सोयीचं राजकारण केलं आहे

या मतदार संघात शाहू महाराजांचा पदस्पर्श झालाय, शाहू महाराज कोल्हापूरला एक संदेश देऊन गेलेत समाज समाज असतो त्यात तुम्ही जातीपाती धर्म आणू नका. हा शाहू महाराजांचा संदेश आहे आणि शाहू महाराजांच्या विचारांवर चालणारा कागल तालुका आहे.शाहू महाराजांच्या विचारांवर चालणाऱ्या कागलने हसन मुश्रीफ यांना प्रचंड फरकाने निवडून आणलं तेव्हा तुम्हाला कौतुक वाटलं नाही,आज तुमच्यातला मुसलमान जागा झाला. हे सोयीचा राजकारण खेळू नका हसन मुश्रीफ खूप जणांनी शरद पवारांच्या स्वभावाचा फायदा घेऊन सोयीचं राजकारण केलं आहे असेही ते यावेळी म्हणाले.

 लाडकी बहीण योजना कोणाची ?

सर्व क्रेडिटचा प्रश्न आहे, सरकारचे पैसे हे आमच्या टॅक्समधून गेलेले पैसे…कधी याच्या नावावर तर कधी त्याच्या नावावर, खरी ती घोषणा आहे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’, ती उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नाही त्यांच्यात काय तू केलं मी केलं हेच चालू राहील असे  जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल.
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला.