AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूड अभिनेत्री कल्की लग्नाआधीच प्रेग्नंट

अभिनेत्री कल्की केकला हिने एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपण पाच महिन्यांची गर्भवती असल्याचं जाहीर केलं.

बॉलिवूड अभिनेत्री कल्की लग्नाआधीच प्रेग्नंट
| Updated on: Sep 29, 2019 | 3:15 PM
Share

मुंबई : लग्नाआधी गरोदर राहण्याचा ट्रेण्ड बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी नवीन नाही. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री कल्की केकला (Kalki Koechlin pregnant) प्रेग्नंट आहे. बॉयफ्रेण्ड गाय हर्षबर्गपासून (Guy Hershberg) कल्की गर्भवती असल्याची माहिती आहे.

कल्कीने एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपण पाच महिन्यांची गर्भवती असल्याचं जाहीर केलं. सोशल मीडियावर फोटो शेअर करुन कल्कीने आपण गाय हर्षबर्गसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचं ऑफिशिअली सांगितलं होतं.

आपण आई होणार असल्याची गुड न्यूज शेअर करतानाच 35 वर्षीय कल्कीने (Kalki Koechlin pregnant) शारीरिक बदल अनुभवत असल्याचंही सांगितलं. मातृत्वसुखाच्या चाहूलीने आपण शहारल्याचं कल्की सांगते.

कल्की केकलां आणि प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी 2011 मध्ये लगीनगाठ बांधली होती. 2013 मध्ये दोघं परस्पर संमतीने विभक्त झाले, तर 2015 मध्ये कल्की आणि अनुराग यांना घटस्फोट मंजूर झाला. घटस्फोटानंतरही कल्की आणि अनुराग चांगले मित्र आहेत. बऱ्याच इव्हेंटमध्ये दोघं एकत्र फिरताना दिसतात.

अनुरागसोबत विवाहबंधनात असताना कल्की आई होण्याच्या विरोधात होती. मात्र काळाच्या ओघात तिला कुटुंबाची गरज जाणवत आहे.

विशेष म्हणजे बाळाच्या जन्माचं प्लॅनिंगही कल्कीने केलं आहे. वॉटर बर्थच्या माध्यमातून आपली प्रसुती व्हावी, अशी कल्कीची इच्छा आहे. या पद्धतीनुसार पाण्याखाली बाळाचा जन्म होतो. ही गर्भवतीसाठी कमी वेदनादायी पद्धत आहे. वर्षअखेरीस गोव्याला जाऊन डिलीव्हरी करण्याचा कल्कीचा मानस आहे.

कल्की आणि हर्ष यांनी बाळाचं नावही निश्चित केलं आहे. मुलगा असो वा मुलगी, दोघांनाही सूट होईल अशा नावाचा विचार दोघांनी केलेला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री एमी जॅक्सन आई झाली, लवकरच विवाहबंधनात

मूळ फ्रेंच वंशीय असूनही कल्की बॉलिवूडमध्ये चांगलीच स्थिरावली आहे. 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देव.डी’ चित्रपटातील तिची चंद्रमुखीची व्यक्तिरेखा लक्षवेधी ठरली होती. त्यानंतर द गर्ल इन येलो बूट्स, शैतान, जिंदगी ना मिलेगी दोबारा, शांघाय, ये जवानी है दिवानी, मार्गारेटा विथ अ स्ट्रॉ, गली बॉय यासारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट तिने केले. याशिवाय सेक्रेड गेम्स 2, मेड इन हेवन या वेब सीरिजमध्येही ती झळकली होती.

काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्री एमी जॅक्सन हिनेही मुलाला जन्म दिला. एमीचा बॉयफ्रेण्ड जॉर्ज पानायियोटोसोबत साखरपुडा झाला आहे. लवकरच ते विवाहबंधनात अडकणार आहेत.

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?.