कोरोनामुळे कैदी कारागृहाबाहेर, पोलीस असल्याचे भासवून लूट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कारागृहातील काही कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आलं आहे. (Kalyan Prisoner robbing again after Releasing Jail on parole)

कोरोनामुळे कैदी कारागृहाबाहेर, पोलीस असल्याचे भासवून लूट
Namrata Patil

|

Oct 09, 2020 | 6:38 PM

कल्याण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कारागृहातील काही कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आलं आहे. याचाच फायदा घेत जेलमधून बाहेर आलेल्या एका कैद्याने पोलीस असल्याची बतावणी करुन नागरिकांना लुबाडण्याचा धंदा सुरु केला होता. राजेंद्र उर्फ राजू नायर असे या आरोपीचे नाव आहे. या सराईत गुन्हेगाराला कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Kalyan Prisoner robbing again after Releasing Jail on parole)

कोरोना सुरु झाल्यानंतर जेलमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोर्टाने बहुतांश कैद्यांना बेल मंजूर केली होती. याच बेलचा सहारा घेत नवी मुंबईत राहणारा राजेंद्र उर्फ राजू नायर हा जेलमधून बाहेर आला. जामीन मिळताच त्याने नागरिकांना लुबाडण्याचा धंदा सुरु केला.

कल्याण पश्चिमेतील लाल चौकी परिसरात एका वयोवृद्ध महिलेला त्या आरोपीने रोखले. त्यानंतर त्या महिलेला पोलीस असल्याचे सांगत तिच्या अंगावर घातलेले दागिने काढण्यास सांगितले. त्यानंतर तिला दागिन्यांची पावती आण असे सांगितले. ती महिला घरी जाऊन पावती घेऊन आली. मात्र त्या ठिकाणी तो आरोपी व्यक्ती नव्हता.

या महिलेने बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. याआधीही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल होते. पोलिसांनी या आरोपीचा शोध सुरु केला. त्यानंतर अखेर पोलीस असल्याची बतावणी करुन नागरिकांना लुबाडणारा राजू नायरच असल्याचं समजलं.

त्याच्या विरोधात दहा गुन्हे दाखल आहे. विशेष म्हणजे रेल्वे पोलीस ठाण्यातही त्याच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी नायर याच्याकडून काही दागिने हस्तगत केलं असून त्याचा तपास सुरु केला आहे. (Kalyan Prisoner robbing again after Releasing Jail on parole)

संबंधित बातम्या : 

पाकिस्तान आणि चीन एकत्र; पीओकेमध्ये अद्ययावत क्षेपणास्त्र यंत्रणा उभारण्याची तयारी

RBI कडून रेपो दराची घोषणा, चौथ्या तिमाहीत GDP वर सकारात्मक परिणाम

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें