अभिनेत्री मालवी मल्होत्रावर चाकूहल्ला, हेच फिल्म इंडस्ट्रीचं सत्य; कंगनाची पुन्हा बॉलिवूडवर टीका

लग्नास नकार दिल्याने मुंबईत चित्रपट अभिनेत्री मालवी मल्होत्रा हिच्यावर चाकूहल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अभिनेत्री मालवी मल्होत्रावर चाकूहल्ला, हेच फिल्म इंडस्ट्रीचं सत्य; कंगनाची पुन्हा बॉलिवूडवर टीका
अक्षय चोरगे

|

Oct 28, 2020 | 8:02 AM

मुंबई : लग्नास नकार दिल्याने मुंबईत चित्रपट अभिनेत्री मालवी मल्होत्रा हिच्यावर चाकूहल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मालवीवर कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणावर प्रतिक्रिया देत बॉलिूवड अभिनेत्री कंगना राणावतने (Kangana Ranaut) पुन्हा एकदा बॉलिडूलला लक्ष्य केलं आहे. (Kangana Ranaut says this is the truth of film industry about Malvi Malhotra stabbing case)

याप्रकरणावर प्रतिक्रिया देताना कंगनाने ट्विट केलं आहे की, “हे फिल्म इंडस्ट्रीचं सत्य आहे. छोट्या शहरातून आलेल्या स्ट्रगलर्ससोबत असंच घडतं. या स्ट्रगलर्सचं इंडस्ट्रीत कोणतंही कनेक्शन नसतं. नेपोटिजमची मुलं (फिल्म स्टार्स अथवा फिल्म इंडस्ट्रीतील मातब्बर लोकांची मुलं) यातून वाचतात, अशा किती जणांवर चाकूहल्ला होतो, बलात्कार केला जातो अथवा त्यांना जीवे मारले जाते?”

कंगनाने या प्रकरणी महिला आयोगाला कारवाई करण्याची विनंती केली आहे. याबाबत कंगनाने अजून एक ट्विट केलं आहे. यात तिने म्हटलं आहे की, “प्रिय मालवी, मी तुझ्यासोबत आहे. मला नुकतंच समजलं की तुझी परिस्थिती गंभीर आहे. मी तुझ्यासाठी प्रार्थना करते. मी रेखा शर्मा यांना विनंती करते की, त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून त्वरीत कारवाई करावी. आम्ही तुझ्यासोबत आहोत आणि तुला न्याय मिळवून देऊ. विश्वास ठेव”.

प्रकरण काय आहे?

29 वर्षीय मालवीने अनेक हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. मालवीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या योगेशकुमार महिपाल सिंग या आरोपीने तिला लग्नाची मागणी घातली होती. मात्र मालवीने ती धुडकावल्याच्या रागातून त्याने तिच्यावर चाकू हल्ला केल्याचा आरोप आहे.

हल्लेखोर आरोपीने फेसबुकवरुन मालवीशी संपर्क साधला होता. याआधी तीन-चार वेळा तो मालवीला भेटला होता. आपण निर्माता असल्याचे सांगून त्याने मालवीची भेट घेतली होती. त्यानंतर त्याने लग्नासाठी तिला प्रपोज केले होते. तो मालवीवर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. मात्र तिचा ठाम नकार होता. ती दुर्लक्ष करत असल्याने योगेश तिचा पाठलाग करत असे.

मालवीच्या नकारामुळे संतापलेला आरोपी तिच्यावर पाळत ठेवून होता. तीन दिवसांपूर्वी मालवी दुबईहून परतली असता तिच्या बिल्डिंगखाली उभा होता. सोमवारी रात्री अंधेरीतील वर्सोवा भागात तो कारने तिथे आला आणि तिच्यावर चाकूने हल्ला केला. मालवीच्या पोटात, मनगटावर आणि बोटावर अशा तीन ठिकाणी वार केल्याची माहिती मिळाली आहे.

जखमी मालवीवर अंधेरीतील कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती सुदैवाने धोक्याबाहेर आहे. मुंबईतील वर्सोवा पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

लग्नास नकार दिल्याचा राग, मुंबईत चित्रपट अभिनेत्रीवर चाकूहल्ला

छोट्या पडद्यावरच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर फसवणुकीचा आरोप, दोन वर्षापासून कर्मचाऱ्याला पैसेच दिले नाहीत!

‘मन्नत’ बंगला विकणार का? चाहत्याच्या प्रश्नावर किंग खानचं जबरदस्त उत्तर

Sushant Singh Rajput | सुशांत प्रकरणात बिहारचे राजकारणी आपली पोळी भाजतायत, सर्व्हेचा दावा!

(Kangana Ranaut says this is the truth of film industry about Malvi Malhotra stabbing case)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें